शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

२०४७ सालचे मीरा भाईंदर शहर कसे असावे ? सिटी ब्रॅण्डिंग वर मान्यवरांचे मार्गदर्शन

By धीरज परब | Updated: February 11, 2024 18:18 IST

पर्यावरण , शिक्षण , आरोग्य , महिला सक्षमीकरण व शहर सुरक्षा ,

मीरारोड - २०४७ साला पर्यंत मीरा भाईंदर शहर कसे असावे ? ह्यावर  महापालिकेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय परिसंवादात उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना पर्यावरण , शिक्षण , आरोग्य , शहर सुरक्षा व महिला सक्षमीकरण तसेच सिटी ब्रॅण्डिंग वर भर दिला . त्यामुळे महापालिका आता मान्यवरांनी सुचवलेले मुद्दे किती व कसे अमलात आणते हे महत्वाचे ठरणार आहे . 

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात पालिकेने शुक्रवारी आयोजित केलेल्या मीराभाईंदर@२०४७ चे उदघाटन वेळी नाशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त सतीश खडके, वसई विरारचे महानगरपालिका आयुक्त अनिलकुमार पवार , मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर, माजी आमदार मुझफ्फर हुसेन आदी उपस्थित होते . 

पहिल्या सत्रात लेखक - दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी महिला सबलीकरण, पुरुषी प्रवृत्ती , भ्रष्टाचार व पर्यावरण विषयांवर भूमिका मांडली . ह्या राजकारण्यांना व भ्रष्टाचाऱ्यांना जो पर्यंत त्यांचे आई - वडील इतका पैसा आणतो कुठून ? याचा जाब विचारत नाही तो पर्यंत भ्रष्टाचार थांबणार नाही . झाडे लावण्या पेक्षा प्रचारावर जास्त खर्च करावा लागतो असे जगताप म्हणाले .  विनया शेट्टी व प्रीथी मारोली यांनी महिलांच्या विषयांवर विचार मांडले.

दुसऱ्या सत्रात मार्केटिंग गुरु तरूनसिंग चौहान यांनी शहराच्या विकासात शाश्वत शहर ब्रँडिंग या विषयावर मार्गदर्शन केले . शेवटच्या सत्रात महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांनी सुरक्षित शहर ह्या संकल्पने ची सविस्तर माहिती फिली . २६/११ वेळीचे अनुभव आणि मुंबई शहराचे पोलीस आयुक्त असतानाचे अनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितले . 

शनिवारच्या सत्राची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.  दुसऱ्या सत्रात माजी परराष्ट्र सचिव आणि राजदूत असलेले डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी पर्यावरण व युवक या विषयावर आपले विचार व्यक्त केले. एमजीएम विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा शिक्षणतज्ञ सुधीर गव्हाणे यांनी तंत्रज्ञानाचा शिक्षणावरील प्रभाव या विषयावर, तर जागतिक दर्जाचे शिक्षणतज्ज्ञ फ्रान्सिस जोसेफ यांनी,शैक्षणिक धोरण आणि सुधारणा या उपस्थितांना मार्गदर्शन केले . शेवटच्या सत्रात नवजात बालरोग तज्ञ, लेखक, वक्ते डॉ.अमोल अन्नदाते यांनी शाळेवर आधारित आरोग्य शिक्षण कार्यक्रमाची परिणामकारकता या विषयावर प्रेक्षकांशी संवाद साधला. 

समारोप प्रसंगी आमदार प्रताप सरनाईक  व गीता जैन आले होते .  परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याचे डॉक्युमेंटेशन करून, त्यावर काम करू तसेच प्रत्येक वर्षी ठरवलेल्या ध्येयांचा आढावा घेऊ, असे महापलिका आयुक्त काटकर यांनी सांगितले . 

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदर