शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेने पालघर, डहाणूत विजयश्री कशी खेचून आणली? वाडा-जव्हारमध्ये उद्धवसेनेच्या सत्तेला भाजपने लावला सुरूंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 09:39 IST

भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, जव्हार नगरपरिषद आणि वाडा नगरपंचायतीवर भाजपचाच झेंडा फडकणार असे जाहीर वक्तव्य करून स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचे आव्हान शिंदेसेना आणि अजित पवार गट या महायुतीतील आपल्या घटक पक्षांना दिले होते.

- हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्कपालघर : महायुतीतील भाजप आणि शिंदेसेनेने पालघरमध्ये एकमेकांना आव्हान दिल्यावर पालघर, डहाणू, जव्हार नगरपरिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुका दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढवल्या. यात अतिशय चुरशीच्या झालेल्या पालघर नगर परिषदेत शिंदेसेनेने आपला बालेकिल्ला कायम राखला आहे. तर डहाणू नगर परिषदेत शिंदेसेनेसह महाविकास आघाडीतीलही अन्य सर्व पक्षांनी एकत्र येत भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा पराभव करीत शिंदेसेनेचा भगवा फडकावला.  जव्हार नगर परिषदेसह आणि वाडा नगरपंचायत जिंकण्यात भाजपला यश मिळाले. या दोन्ही ठिकाणी उद्धवसेनेच्या असलेल्या सत्तेला भाजपने दणका दिला. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू, पालघर, जव्हार नगरपरिषद आणि वाडा नगरपंचायतीवर भाजपचाच झेंडा फडकणार असे जाहीर वक्तव्य करून स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याचे आव्हान शिंदेसेना आणि अजित पवार गट या महायुतीतील आपल्या घटक पक्षांना दिले होते. भाजपने नगराध्यक्षाचे उमेदवार म्हणून जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांची उमेदवारी जाहीर केल्यावर त्यांच्या विरोधात शिंदेसेनेने राजू माच्छी या माजी नगरसेवकाला उमेदवारी दिली आणि शिंदेसेना, अजित पवार गटासह महाविकास आघाडीतील काही घटक पक्षांनी एकत्र येत भरत राजपूत यांच्या पराभवाची रणनीती आखली होती.

डहाणूत प्रचार सभेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘डहाणू मधील एकाधिकारशाही संपवून रावणाच्या अहंकाराचे दहन करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. त्यांच्या या आवाहनाला डहाणूकरांनी प्रतिसाद दिला. भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांचा शिंदेसेनेचे राजू माच्छी यांनी ४०६५ इतक्या मतांनी पराभव केला. मात्र भाजपाने २७ पैकी १७ जागा जिंकत डहाणू परिषदेत सर्वाधिक जागा घेतल्या.

जव्हार, वाडा येथे काय घडले?जव्हार नगर परिषदेवर आणि वाडा नगरपंचायतीवर आधी उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व होते, मात्र त्यांच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपने २० पैकी १४ जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा उदावंत यांना ३८६५ मते मिळाली. 

English
हिंदी सारांश
Web Title : How Shinde Sena snatched victory in Palghar, Dahanu; BJP's surge.

Web Summary : Shinde Sena retained Palghar, won Dahanu defeating BJP's district president. BJP gained control in Jawhar and Wada, challenging Uddhav Sena's dominance.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Shiv Senaशिवसेना