शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात हाऊसिंग फेडरेशन करणार पर्यावरणपूरक सामूहिक अग्निहोत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 22:14 IST

ठाण्यात प्रथमच पर्यावरणाला पूरक अशा सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार असून त्यातील साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केल्याची माहिती ठाणे डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी दिली.

ठळक मुद्देदहा हजार ठाणेकर होणार सहभागीपर्यावरण संवर्धनासाठी प्रथमच आयोजनसाडेचार हजार रहिवाशांनी केली नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशन आणि विश्वफाऊंडेशनच्या वतीने ठाण्यात प्रथमच पर्यावरणाला पूरक अशा सामूहिक अग्निहोत्राचे आयोजन केले आहे. यामध्ये सुमारे १० हजार नागरिक सहभागी होणार असून त्यातील साडेचार हजार नागरिकांनी नोंदणी केली आहे. या अग्निहोत्रासाठी लागणाऱ्या होमकुंडासह सर्व साहित्याचेही मोफत वाटप केले जाणार असल्याची माहिती ठाणे डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लिमिटेडचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी बुधवारी दिली.येत्या ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास उपवन तलावाच्या बाजूला असलेल्या मैदानामध्ये हा अनोखा उपक्रम होणार आहे. याठिकाणी उपस्थित राहण्यासाठी ठाणे रेल्वेस्थानकापासून पोखरण रोड क्रमांक एक येथील कॅडबरी कंपनी आणि पोखरण रोड क्रमांक दोन येथील मारिया हॉल तसेच माजिवडा येथून ठाणे परिवहन सेवेची (टीएमटी) दुपारी ३.३० ते ५.३० या काळात बसची व्यवस्था केली आहे.सामूहिक अग्निहोत्र हा पर्यावरणासाठी पूरक असा होम असून तो अक्कलकोट शिवपुरी येथील गजानन महाराज यांनी सुरू केलेला आहे. तो सूर्योदय आणि सूर्यास्त अशा दोन वेळेलाच करणे अपेक्षित असतो. असा अग्निहोत्र घरी केल्यास त्यापासून सकारात्मक ऊर्जा तयार होते. विद्यार्थ्यांसाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. हाउसिंग फेडरेशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्र मास शिवपुरी येथील डॉक्टर त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार निरंजन डावखरे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.सोसायट्यांसह विद्यार्थ्यांचाही सहभागया अग्निहोत्रासाठी वर्तकनगर, शिवाईनगर, शास्त्रीनगर या भागातील अनेक गृहसंकुलांतील रहिवासी सहभाग घेणार आहेत. याच परिसरातील आर.जे. ठाकूर, थिराणी विद्यालय आणि ब्राह्मण विद्यालय या शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थीही आपला सहभाग नोंदविणार आहे. दहा हजार रहिवासी या अग्निहोत्रामध्ये सहभाग नोंदविण्याचे उद्दिष्ट असून त्यातील साडेचार हजार रहिवासी आणि विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचेही राणे यांनी सांगितले. या अग्निहोत्रासाठी जोडप्याने एकत्र बसण्याची आवश्यकता नसून कोणतीही व्यक्ती बसू शकते. अग्निहोत्राने पवित्र आणि मंगल झालेल्या वातावरणात ध्यान, उपासना, मनन, चिंतन, अभ्यास करणे सहज साध्य होते. त्याचा उपयोग आपल्या परिसरातील पर्यावरणातील प्रदूषण कमी होऊन आॅक्सिजनमध्ये वाढ होते. त्याचप्रमाणे कार्बनडायॉक्साइडचे प्रमाण कमी होते. याला शास्त्रीय दृष्टिकोनातूनही मान्यता आहे. संपूर्ण जगात अनेक ठिकाणी असंख्य कुटुंबे अग्निहोत्राचे आचरण करून त्यापासून लाभ मिळवित असल्याचा दावाही राणे यांनी केला.

टॅग्स :thaneठाणेenvironmentपर्यावरणSocialसामाजिक