शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आगीत घरातील साहित्य जळाले, गॅस सिलिंडरचा नोझल लिकेज झाल्यानं लागली आग

By कुमार बडदे | Updated: January 9, 2025 09:00 IST

या वाडीतील चाळीमधील घर क्रमांक ९६८ मध्ये  सचिन देवकाते रहातात. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा नोझल गुरुवारी लिकेज झाला. त्यातून निघत असलेला गॅस घरामध्ये पसरल्यामुळे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास  घरामध्ये आग लागली...

मुंब्राः गॅस सिलेंडरचा नोझल लिकेज झाल्यामुळे लागलेल्या आगीत घरातील विविध प्रकारचे साहित्य जळून नुकसान झाल्याची घटना गुरुवारी सकाळी मुंब्र्यातील रेतीबंदर परीसरात घडली.मुंब्र्यातील रेतीबंदर भागातून धावणा-या मध्य रेल्वेच्या जलद मार्गा जवळील दत्त चौक परीसरात खंडोबा वाडी आहे.

या वाडीतील चाळीमधील घर क्रमांक ९६८ मध्ये  सचिन देवकाते रहातात. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरचा नोझल गुरुवारी लिकेज झाला. त्यातून निघत असलेला गॅस घरामध्ये पसरल्यामुळे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास  घरामध्ये आग लागली. स्थानिक रहिवाशी गुणवंत यांनी याबाबतची माहिती ठामपाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली,माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एक रेस्क्यू वाहनाच्या मदतीने सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु घरातील कपडे,भांडी या संसार उपयोगी वंस्तूसह विद्युत वायरींग जळून नुकसान झाले.सुरक्षेच्या दृष्टीने सदरचा गॅस सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिका-यांनी दिली.

टॅग्स :mumbraमुंब्राfireआग