शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या घरात, तर आयुक्तांच्या दारात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 00:48 IST

सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले होते.

ठाणे : ठाण्यात मान्सूपूर्व पहिल्याच पावसाने पालिकेच्या कामांची पोलखोल केली. सोमवारी अवघा एक तास पडलेल्या पावसामुळे पालकमंत्र्यांच्या निवास्थानाच्या तळघरात पाणी शिरले होते, तर आयुक्तांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावरही पाणीच पाणी झाले होते. शहराच्या इतर भागातही ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने नाल्यातील कचरा बाहेर फेकला गेल्याचे आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाल्याने अनेकांना रात्र अंधारात काढावी लागली. ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूककोंडीचाही सामना करावा लागला.

सोमवारी संध्याकाळपासूनच पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. रात्री ९ च्या दरम्यान जोरदार पावसाला सुरुवात झाली. फक्त एक तास पाऊस झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले. शहरातील जे सखल भाग आहेत, त्या ठिकाणी पाणी साचलेच, मात्र याचा विशेष फटका पालिका आयुक्तांचा बंगला आणि पालकमंत्र्यांनादेखील बसला. हिरानंदानी इस्टेस्टकडे जाणाऱ्या पातलीपाडा येथे जाणाºया रस्त्यावर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा बंगला आहे. त्याच्या समोरच्या रस्त्यावरच मोठ्याप्रमाणात पाणी साचले. त्यातही पातलीपाडा येथील सेवा रस्त्याचे काम केले असले तरी त्याचा स्लोप हा पुढे हिरानंदानी इस्टेटकडे जाणाºया रस्त्याला दिल्याने आणि सेवा रस्ता आणि मुख्य रस्त्याच्यामध्ये असलेल्या फुटपाथखालील गटाराचे तोंड बंद असल्याने, तसेच काही ठिकाणी मुख्य व सेवा रस्ताच एक झाल्याने पावसाचे पाणी आयुक्तांच्या बंगल्यासमोरील रस्त्यावर जमा झालेहोते. दुसरीकडे मान्सूनपूर्व कामांवर जातीने लक्ष देणाºया पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नितिन कंपनी येथील बंगल्याच्या बेसमेंटमध्येदेखील पाणी शिरल्याने ते बाहेर काढण्यासाठी सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत जेटिंगची मशिन आणि पंप लावले होते.अनेक घरांत शिरले पाणी : एरव्ही मोठा पाऊस झाला की शहरातील सखल भागातही पाणी प्रत्येक वर्षी साचत असले तरी सोमवारी एका तासाच्या पावसानेच सखल भागात मोठ्याप्रमाणात पाणी साचले. यामध्ये वंदना सिनेमा, लोकमान्यनगर, शिवाईनगर, वर्तकनगर भागात नागरिकांच्या घरात आणि रस्त्यावर पाणी साचले होते. रात्री उशिरा झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी पडझडदेखील झाली असून सिद्धार्थनगर येथे भिंत कोसळल्याची घटना घडली. तर कॅडबरीच्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने काही काळ या ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. विशेष म्हणजे या पावसाने घोडबंदर येथील आर मॉल येथे हायवेवर पाणी साचले होते.वीजपुरवठा झाला खंडित : सोमवारच्या एका तासाच्या पावसामुळे नागरिकांना केवळ नालेसफाईचा फटका बसला नसून अनेक ठिकाणी या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. बाजार पेठ, घोडबंदर रोड, मल्हार सिनेमा परिसर, कळवा, खारेगाव आणि ठाण्यातील काही भागात रात्री वीज पुरवठा खंडित झाला होता. मंगळवारी सकाळीदेखील शहरातील काही भागात वीज गुल होती. पावसाळ्यापूर्वी विजेच्या वाहिन्या टाकण्याची कामे पूर्ण करून त्यानंतर या कामासाठी खड्डा खोदू नये, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. तर काही कामांना मुदतवाढदेखील दिली होती. त्यामुळेच कदाचित ठाणेकरांना याचा फटका बसला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.सर्वत्र दाणादाणच्पहिल्याच पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी दाणादाण उडाली. पावसामुळे बदलापूरमध्ये तब्बल ८ तास वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. मुरबाड आणि शेणवा येथे काही घरांवरील पत्रे वादळीवाºयाने उडून गेले. याशिवाय काही घरांवरील कौलांचे नुकसान झाले.च्कल्याणमध्ये ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याने गटारे तुंबली. पालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे केली होती. परंतू नाल्यांमधून काढलेला कचरा तिथेच टाकल्याने तो पावसासोबत पुन्हा नाल्यांमध्ये वाहून गेला. त्यामुळे नाले तुंबले. याशिवाय कल्याणमध्ये काही भागात घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडल्या.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊसEknath Shindeएकनाथ शिंदे