शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 12 वीपर्यंतच्या वर्गांचे वसतीगृह - आश्रमशाळा सोमवारपासून बंद   

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 22:47 IST

वाढत्या रुग्ण संख्येवरील उपाययोजने अंतर्गत त्यांच्या अखत्यारीतील आश्रमशाळा, वसतीगृह पुढील आदेश होईपर्यंत सोमवारपासून बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे. 

ठाणे - जिल्हयातील संपूर्ण ग्रामीण भागासह  शहापूर व मुरबाड नगरपंचायत क्षेत्रातील इयत्ता ५ वी ते १२ वीचे वर्गांसाठी केवळ आदिवासी विकास विभागाची सर्व वसतिगृहे व निवासी आश्रमशाळा, समाजकल्याण विभागाचे अधिपत्याखालील सर्व वसतिगृहे व निवासी शाळा २२ मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री तडकाफडकी  जारी केले आहेत जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या गेल्या दोन दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे.  त्यामुळे प्रशासन चिंतेत आहे.  या वाढत्या रुग्ण संख्येवरील उपाययोजने अंतर्गत त्यांच्या अखत्यारीतील आश्रमशाळा, वसतीगृह पुढील आदेश होईपर्यंत सोमवारपासून बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहे.  या आदेशासह जिल्हाधिकाऱ्यांनी  इयत्ता १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहणे ऐच्छिक केले आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू ठेवण्याचे त्यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे. 

 ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांचे कार्यक्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगर परिषद कार्यक्षेत्र वगळून जिल्ह्यातील सर्व संबंधितांनी तात्काळ आदेशाची अंमलबजावणी करण्याची तंबीही त्यांनी संबंधीत प्रशासनाला दिली आहे. याबाबतचे सर्व समन्वयन व संनियंत्रणासाठी आदिवासी विकास विभागासह समाजकल्याण, नगर पंचायत व जिल्हा परिषदेच्या  शिक्षण विभागाला जबाबदार धरण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम  व भारतीय दंड संहिता नुसार दंडनीय, कारयदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेEducation Sectorशिक्षण क्षेत्र