शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाचे काम अपूर्ण, आयोग करणार तपासणी; उच्च न्यायालयाची ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 05:50 IST

मुंबई : मुंब्रामधील कौसा येथे १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी २००८ मध्ये दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, गेल्या ...

मुंबई : मुंब्रामधील कौसा येथे १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी २००८ मध्ये दहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मात्र, गेल्या १५ वर्षांत रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊ न शकल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. रुग्णालयाचे काम पूर्ण का झाले नाही, हे तपासण्यासाठी तीन सदस्यीय आयोगाची नियुक्ती करण्यात आली आहे.

कौसा येथील प्रस्तावित रुग्णालयाचा खर्च आता १२२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यासंदर्भात असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राइट्स या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मुंब्रा-कौसाची लोकसंख्या जास्त असून तिथे केवळ एक सार्वजनिक आरोग्य केंद्र आहे. येथून कळवा रुग्णालयात पोहचण्यासाठी एक तास लागतो. त्यामुळे तातडीची वैद्यकीय गरज असलेल्या रुग्णासाठी हा प्रवास प्राणघातक ठरतो, असे याचिकेत नमूद आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

२००८ मध्ये ठाणे महापालिकेने १०० खाटांच्या रुग्णालयासाठी ४१,८०० चौरस मीटर जागा राखीव ठेवली. २०१४ मध्ये वर्क ऑर्डर काढण्यात आली आणि त्यानुसार २४ महिन्यांत रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार होते. मात्र, अद्याप बांधकाम पूर्ण झालेले नाही आणि रुग्णालयाचा खर्च वाढला. त्यानंतर पालिकेने या रुग्णालयात शवागार, ऑपरेशन थिएटर आणि कॅन्टीन बांधण्याचा निर्णय घेतला.

कळव्यातील नागरिकांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याचे ठामपाने न्यायालयात मान्य केले. ‘पालिकेने ही वस्तुस्थिती मान्य केल्यानंतर रुग्णालय बांधण्यासाठी आणि कार्यान्वयित करण्यासाठी इतका विलंब का लागत आहे, हे आम्हाला समजत नाही,’ असे न्यायालयाने म्हटले.

राज्यघटनेचे कलम २१ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला चांगली व परवडणारी आरोग्यसेवा मिळविण्याचा अधिकार आहे आणि त्यांचा हा अधिकार नाकारता येणार नाही. मात्र, या प्रकरणात ठाणे महापालिकेची उदासीनताच पाहायला मिळते.     - उच्च न्यायालय.

रुग्णालयाचे बांधकाम अपूर्ण का  राहिले, नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे तपासण्यासाठी न्यायालयाने आयोगाची नेमणूक केली. आयोगात जे. जे. रुग्णालयाचे डॉक्टर, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता आणि ॲड.  मीनाज ककालिया यांचा समावेश असून यांना ८ नोव्हेंबर रोजी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :thaneठाणे