शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयासाठी दिलेला भूखंड अखेर शासनजमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 00:35 IST

निर्णयाबाबत अधिकारी अनभिज्ञ; सुनावणीला गैरहजर

- पंकज पाटीलअंबरनाथ : ५२ वर्षांपूर्वी अंबरनाथ नगर परिषदेला रुग्णालय उभारण्यासाठी शासनाने दिलेला भूखंड पालिकेकडून काढून घेत पुन्हा शासनजमा केला आहे. विशेष म्हणजे, याप्रकरणी सुनावणी करताना पालिकेने कोणत्याही तारखेला आपली बाजू मांडलेली नाही. प्रत्येक सुनावणीवेळी गैरहजर राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही सर्व जागा शासनजमा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय झालेला असतानाही पालिकेच्या एकाही अधिकाºयाला त्याची कल्पना नाही. पालिकेचे नगरविकास विभाग यासंदर्भात लक्ष देत नसल्यानेच ही परिस्थिती ओढावली आहे.

राज्य शासनाने अंबरनाथ नगरपरिषदेला ३ फेब्रुवारी १९६५ मध्ये कोहोज खुंटवली भागातील सर्व्हे नंबर १५०/अ पैकी एक हेक्टर १० गुंठे म्हणजे १३ हजार २०० चौरस वारांचा मोठा भूखंड रुग्णालय उभारण्यासाठी दिला होता. अंबरनाथमधील फादर अ‍ॅग्नल शाळेला लागूनच हा भूखंड असून त्या भूखंडाच्या संरक्षणासाठी अंबरनाथ पालिकेने संरक्षक भिंतही उभारली आहे. मात्र, आज हा भूखंड पालिकेच्या हातातून निसटला आहे.

५२ वर्षांपूर्वी शासनाने दिलेला भूखंड हा काही नियम आणि अटींवर पालिकेला देण्यात आला होता. तशी ७/१२ मध्ये नोंदही करण्यात आली होती; मात्र ५२ वर्षांत या आरक्षित भूखंडावर पालिकेने कोणतेही रुग्णालय न उभारल्याने त्या प्रकरणी जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून सुनावणी घेण्यात आली. भूखंड पालिकेला दिल्याने याप्रकरणात पालिकेची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात ठेवण्यात आलेल्या सुनावणीला पालिकेने कोणताही खुलासा दिला नाही. १० जून २०१४, २१ जुलै २०१४, २७ जानेवारी २०१५, १६ मार्च २०१५, ३० मे २०१५ आणि १४ मार्च २०१६ रोजी अशा सहा सुनावण्या ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, एकाही सुनावणीला पालिकेने आपली बाजू मांडलेली नाही. त्यामुळे ही जमीन शासनजमा करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता.

१३ डिसेंबर २०१६ रोजी जिल्हाधिकाºयांनी उपविभागीय अधिकाºयांना शर्तभंग प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. उपविभागीय अधिकाºयांनी या प्रकरणाची चौकशी करत असताना ज्या अटी आणि शर्तींवर हा भूखंड देण्यात आला होता, त्याची चाचपणी केली. पाचही अटी व शर्तींची पूर्तता नगर परिषदेने केलेली नसल्याने त्यांच्याकडून हा भूखंड काढून घेण्याचा आणि शासनजमा करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

या अटींची केली नाही पूर्तता

ज्या पाच अटींवर ही जागा पालिकेला देण्यात आली होती, त्यातील पहिली अट म्हणजे जागा ताब्यात घेतल्यापासून दोन वर्षांत जागेचा वापर करणे गरजेचे होते. शर्त क्रमांक २ नुसार जिल्हाधिकाºयांकडे बांधकामाचा प्लान आगाऊ मंजूर करून बांधकाम करणे गरजेचे होते. मात्र तेही केलेले नाही. शर्त क्रमांक ३ प्रमाणे जागेवर रुग्णालय उभारणे गरजेचे होेते; मात्र अद्याप ते उभारलेले नाही. शर्त क्रमांक ४ नुसार ज्या कामासाठी जागा दिली आहे त्यासाठीच ही जागा वापरणे गरजेचे होते. मात्र, त्या जागेचा वापर त्या कामासाठी केलेला नाही.

शर्त क्रमांक ५ नुसार जमीन कबूल करून दिल्याचा पुरावा अद्याप दिलेला नाही. या पाचही अटींची पूर्तता नगर परिषदने न केल्याने त्यांचा रुग्णालयाचा भूखंड हा शासनजमा करण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांनी यासंदर्भात काही निर्णय घेतला असेल तर हा भूखंड पुन्हा मिळावा या अनुषंगाने शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे अंबरनाथ नगर परिषद मुख्याधिकारी देविदास पवार यांनी सांगितले.

टॅग्स :ambernathअंबरनाथThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल