शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

‘त्याचा’ विजयाचा षटकार ठरला अखेरचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 08:54 IST

Bhiwandi News: दोन चेंडूंत चार धावा आवश्यक असताना खेळपट्टीवर उभ्या असलेल्या संजय गोविंद ठाकरे या क्रिकेटपटूने उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करीत असतानाच या क्रिकेटपटूवर काळाने झडप घातली. 

भिवंडी : दोन चेंडूंत चार धावा आवश्यक असताना खेळपट्टीवर उभ्या असलेल्या संजय गोविंद ठाकरे या क्रिकेटपटूने उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मात्र, विजयाचा आनंद साजरा करीत असतानाच या क्रिकेटपटूवर काळाने झडप घातली.  तालुक्यातील अंबाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संजय गोविंद ठाकरे हे उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. रविवारी ४५ वर्षांवरील खेळाडूंसाठी ‘४५ प्लस क्रिकेट स्पर्धेचे’ तालुक्यातील घोटगाव येथे आयोजन केले होते. ठाकरे हे ‘गुड मॉर्निंग’ संघातर्फे खेळण्यासाठी गेले होते. गुड मॉर्निंग संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकातील दोन चेंडूंवर चार धावांची गरज होती.  खेळपट्टीवर फलंदाजी करणाऱ्या ठाकरे यांनी उत्तुंग षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विजयाचा आनंद साजरा करीत घरी निघालेल्या ठाकरे यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना तत्काळ अंबाडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे