शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तपासणीमुळे दहिसर चेकनाकापासून काशीमीरापर्यंतचा महामार्ग जाम; वाहनांच्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 15:18 IST

Miraroad News : काशीमीरा महामार्ग आणि  रस्ते वाहनांनी जाम झाले असून लोक तासन तास अडकून पडत आहेत. सर्वात गंभीर स्थिती रुग्णवाहिकांची असून कोंडीचा फटका पडून रुग्णांचे हाल होत आहेत.

मीरारोड -  राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेले निर्बंध आणि संचारबंदीमुळे कारणा शिवाय फिरणाऱ्यांची काटेकोर तपासणी मुंबई पोलिसांनी दहिसर सुरू केली आहे. परंतु आधी पासूनच या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना आता तपासणी नाक्यामुळे कोंडीत मोठी वाढ झाली आहे. काशीमीरा महामार्ग आणि  रस्ते वाहनांनी जाम झाले असून लोक तासन तास अडकून पडत आहेत. सर्वात गंभीर स्थिती रुग्णवाहिकांची असून कोंडीचा फटका पडून रुग्णांचे हाल होत आहेत.

कोरोनाचा उद्रेक राज्यात झाल्याने संसर्ग रोखण्यासाठी ३०  एप्रिलपर्यंत निर्बंध लागू केलेले आहेत. त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी दहिसर चेकनाका येथे विनाकारण फिरणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी तपासणी नाका सुरू केला आहे. येणाऱ्या वाहन व आतील लोकांची चौकशी केली जात आहे. जेणे करून मुंबई अहमदाबाद महामार्गावरील काशीमीरा व सगणाई देवी मंदिरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. चेकनाकाकडे जाणाऱ्या पेणकरपाडा आदी अंतर्गत रस्ते सुद्धा वाहनांच्या कोंडीने जाम झाले आहेत.

वाहन कोंडीत रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडत आहेत. त्यांना मोकळा मार्ग करून देण्यासाठी काशीमीरा पोलीस व वाहतूक पोलीस आणि वार्डनची मोठी कसरत होत आहे. कारण आधीच वाहनकोंडीत तास न तास लोक अडकून पडले असल्याने कोंडी दूर करण्यासह रुग्णवाहिकांना तातडीने मार्ग मोकळा करून देणे असा दुहेरी ताण यंत्रणेवर पडला आहे . आधीच दहिसर चेकनाका व टोल नाका येथे सकाळी जाताना व सायंकाळी येताना प्रचंड वाहतूक कोंडी असते. रोजचा वाहतूक कोंडीचा त्रास असह्य झाला असताना आता तपासणी नाक्यामुळे त्रासात मोठी भर पडली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmira roadमीरा रोड