शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्हयात कडेकोट पोलीस बंदोबस्त

By जितेंद्र कालेकर | Updated: October 20, 2019 22:58 IST

विधानसभा निवडणूकीसाठी ठाणे शहर आणि जिल्हयात केंद्रीय राखीव पोलिसांसह राज्य राखीव पोलिसांच्या जादा तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. दर पाच मिनिटांनी प्रत्येक मतदान केंद्रावर सेक्टर पेट्रोलिंगद्वारे पोलिसांचे फिरते पथक टेहळणी करणार असून गैरकृत्य आढळल्यास या पथकाकडून तात्काळ कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्दे १३ केंद्रीय पोलीस पथकांसह सीमा सुरक्षा आणि राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त तुकड्याही तैनात दर पाच मिनिटांनी पोलिसांचे फिरते पथक येणार मतदान केंद्रावरग्रामीण भागात तीन हजार पोलीस तैनात

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सोमवारी होत असलेली विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी संपूर्ण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या तसेच ग्रामीण कार्यक्षेत्रात पोलिसांसह गृहरक्षक दलाचे जवान, केंद्रीय पोलीस, सीमा सुरक्षा दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपन्याही तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे, भिवंडी, उल्हासनगर या तीन महापालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगर परिषदांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांत १४ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. याठिकाणी चार हजार १६२ मतदानकेंदे्र असून या सर्व ठिकाणी सोमवारी सकाळी ६ ते शेवटचे मतदानयंत्र स्ट्राँग रूमध्ये जाईपर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे.असा आहे बंदोबस्तयासाठी १२ उपायुक्तांच्या अधिपत्याखाली ३१ सहायक आयुक्त, १०७ पोलीस निरीक्षक, ४०६ सहायक पोलीस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक, सहा हजार ९३ पोलीस कर्मचारी आणि १२९५ गृहरक्षक दलाच्या जवानांची नेमणूक आहे. यातील दोन हजार ९६२ पोलीस आणि १२०० गृहरक्षक दलाचे जवान हे मतदानकेंद्रांवर तैनात ठेवले आहेत. याशिवाय, नागालॅण्ड आणि सीमा सुरक्षा दलाच्या कंपन्या, राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या, दंगल नियंत्रण पथकाच्या तीन कंपन्या त्यात्या ठिकाणी तैनातीला आहेत. सहायक आयुक्त प्रत्येक मतदारसंघासाठी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कुठेही अनुचित प्रकार, पैसे वाटण्यासारखा किंवा कोणताही गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी चार ते पाच वाहने अशी १५० अतिरिक्त वाहने भाड्याने घेतली आहेत. रविवारी सायंकाळीच ईव्हीएम मशीनसह त्यात्या ठिकाणी नेमलेले अधिकारी, कर्मचारी रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली...........................प्रत्येक पाच मिनिटांमध्ये येणार पोलीसयावेळी सेक्टर पेट्रोलिंग राबविण्यात येणार आहे. त्यामुळे दर पाच मिनिटांनी मतदानकेंद्रावर पोलिसांच्या गस्तीचे पथक मतदानकेंद्रावर पोहोचणार आहे. प्रत्येक वेळी येणाऱ्या वेगवेगळ्या पथकांना मतदानकेंद्रांवरील हालचाली आणि कोणत्याही गैरकृत्याची माहिती मिळेल. तसेच काही आढळल्यास हे पथक तत्काळ कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.......................*ग्रामीण भागात तीन हजार पोलीस तैनातठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात विधानसभेचे नऊ मतदारसंघांचा समावेश आहे. याठिकाणी तीन केंद्रीय निमलष्करी दलाच्या तीन तुकड्यांसह सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त याठिकाणी तैनात आहे. याठिकाणी सात उपअधीक्षक, २७ निरीक्षक, ११७ उपनिरीक्षक, १७५६ कर्मचारी आणि ८०० गृहरक्षक दलाची नेमणूक केली आहे. याठिकाणी १५१० बुथ असून ११० क्रिटिकल तर ११२ संवेदनशील केंद्रे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूकPoliceपोलिस