शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापौर राजेंद्र देवळेकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 18:14 IST

जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केले.

कल्याण - जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवकपद कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने रद्द केले. मात्र या निर्णयाला देवळेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज जालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर यांनी कल्याण न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत देवळेकर यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. त्यामुळे देवळेकर यांना मोठा दिलासा मिळाला असून, या निर्णयामुळे त्यांचे महापौरपद कायम राहणार आहे.शिवसेना उमेदवार राजेंद्र देवळेकर यांनी 2015 साली प्रभाग 16 मिलिंदनगर घोलपनगरमधून पालिकेची सार्वत्रिक निवडणूक जिंकली होती. हा प्रभाग इतर मागास प्रवर्गासाठी राखीव होता. त्यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले भाजपचे उमेदवार अर्जुन म्हात्रे यांनी देवळेकर यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचे म्हणत त्यांच्या निवडीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. यावर 30 नोव्हेंबर 2017 रोजी न्यायालयाने अर्जुन म्हात्रे यांचे तांत्रिक मुद्दे ग्राह्य धरत देवळेकर यांची निवड रद्द ठरवली. मात्र याचवेळी उच्च न्यायालयात देवळेकर यांना उच्च न्यायालयात बाजू मांडता यावी यासाठी या निर्णयाला स्थगितीही दिली होती. यानुसार उच्च न्यायालयात जालेल्या सुनावणीत देवळेकर यांची बाजू एड. प्रसाद ढाकेफाळकर आणि एड. कुलकर्णी यांनी मांडली. यावर निर्णय देताना न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर यांनी कल्याण न्यायालयाचा निर्णय रद्द ठरवत देवळेकर यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले.

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय कल्याण न्यायालयानं दिला होता. निवडणूक अर्जासह राजेंद्र देवळेकरांनी दोन वेगवेगळी जातवैधता प्रमाणपत्र जोडल्यानं त्यांचं नगरसेवकपद रद्दबातल ठरवण्यात आलं होतं. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देवळेकरांसह शिवसेनेलाही कल्याण-डोंबिवलीत मोठा झटका बसला होता. दरम्यान, या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी राजेंद्र देवळेकरांना एक महिन्याची मुदत सुद्धा न्यायालयानं दिली होती. या निकालानंतर राजेंद्र देवळेकर म्हणाले की, माननीय कल्याण न्यायालयानं माझी निवडणूक रद्दबातल ठरवण्याचा निर्णय दिला. परंतु त्याच न्यायालयानं या निर्णयास अपील पिरियडपर्यंत म्हणजेच उच्च न्यायालयात अपील करेपर्यंत या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात मला स्थगिती मिळेल असा विश्वास आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवलीkalyanकल्याण