शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गांजा, चरसचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 04:38 IST

अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका अट्टल तस्कराला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार किलो गांजा आणि तीन किलो चरस जप्त करण्यात आले आहे.

कल्याण - अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका अट्टल तस्कराला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चार किलो गांजा आणि तीन किलो चरस जप्त करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात याआधीही सात गुन्हे दाखल आहेत.पश्चिमेतील डॉ. आंबेडकर रोड परिसरात एक व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सतीश सोनवणे आणि साहेबराव माळी यांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे सापळा लावून हुसेन आबू खान ऊर्फ कमांडो (६१, रा. मदारछल्ला जमादारवाडा) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ असलेल्या एका बॅगेत चरस, गांजा व रोख रक्कम आढळली. ती जप्त केली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक (गुन्हे) लक्ष्मण तांबे, उपनिरीक्षक राहुल व्हरकाटे, हवालदार सुरेश पाटील, हवालदार मनीष राजगुरू, नाईक सतीश सोनवणे, सचिन साळवी, सुनील पाटील, साहेबराव माळी, शिपाई व्ही.एम. बच्छाव, महिला पोलीस नाईक वर्षा राजगुरू आणि अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस नाईक काळुराम शिरोते यांच्या पथकाने ही कारवाई केली.दरम्यान, मुंब्रा शहरात अमली पदार्थांच्या विक्रीचे व्यवहार होतात. पोलिसांनी अनेकदा अमली पदार्थांचा साठा येथून जप्त केला आहे.काश्मीरमधून येतो मालकाश्मीर येथून हे अमली पदार्थ मुंब्रा येथे आणण्यात आले होते. हुसेनने ते तेथून कल्याणमध्ये आणले. हुसेनला कल्याण न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र तायडे यांनी माध्यमांना दिली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrimeगुन्हा