शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 03:31 IST

पाणी साचून वाहतूक मंदावली : विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, ठाणेकरांचे हाल, वादळवाऱ्याने झाडे कोसळली

ठाणे : मुसळधार पावसामुळे ठाणे, मुंबईतील जनजीवन मंगळवारी विस्कळीत झाले. पावसाचे पाणी रस्त्यावर साचून घोडबंदर रोडसह ठिकठिकाणची वाहतूक मंदावली होती. ओवळा परिसरात तुंबलेल्या पाण्यात वीज प्रवाहित होऊन १५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी दिवसभर अधूनमधून पाऊस हजेरी लावतच होता. घोडबंदर रोडवर सकाळी ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे ठाण्याहून भार्इंदर, बोरीवली तसेच अहमदाबादकडे जाणारी वाहतूकही बराच वेळ मंदावली होती. काही वेळ पावसाने विश्रांती घेताच पाण्याचा निचरा होऊन वाहतूक सुरळीत झाली. मात्र तोपर्यंत घोडबंदर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शहरातील वागळे इस्टेट, पाचपाखाडी, मुलुंड चेक नाका, घोडबंदर रोड, कळवा, मनीषानगर, कापूरबावडी आदी ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे ठाणेकरांचे हाल झाले. सायंकाळनंतर पावसाने पुन्हा जोर धरला होता.

दरम्यान, ओवळा येथील हनुमान मंदिराजवळ विजेची भूमिगत तार क्षतीग्रस्त झाली आहे. पावसामुळे या ठिकाणी पाणी तुंबले असता त्यात वीज प्रवाहित झाली. त्यामुळे विजेचा धक्का लागून रकीब आशापुरम मंडल (१५) याचा जागीच मृत्यू झाला. वर्तकनगर येथील सृष्टी नावाच्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग निखळला. कोपरी येथे उभ्या कारवर झाड पडले. ठाण्यात आणखी तीन ठिकाणी झाडे कोसळली.पाणलोट क्षेत्रात जोर कमीच्जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे धरणांचा पाणीसाठा कमी झाला आहे. भातसा धरणात केवळ ८ मिमी पाऊस पडला. बारवीत ११, मोडकसागरमध्ये सात, तानसात पाच आणि आंध्रा धरणात १९ मिमी पाऊस पडला.च्या धरणांच्या शहापूर व मुरबाड तालुक्यात प्रत्येकी अवघा ४ मिमी पाऊस पडला आहे. भिवंडी ७३ मिमी, अंबरनाथला ७२ मिमी, उल्हासनगरला ५६, तर कल्याणला ५१ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात सरासरी अवघा ८५ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. ठाणे शहर व तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक १00 मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे