शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात जोरदार पावसाची हजेरी; सिध्देश्वर तलाव परिसरात संरक्षक भिंत पडली!

By अजित मांडके | Updated: July 20, 2024 18:43 IST

मागील २४ तासांत १०४.१० मिमी पावसाची नोंद

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यात पावसाने आता मागील दोन ते तीन दिवसापासून चांगलीच हजेरी लावली आहे. त्यात शुक्रवारी रात्री पासून सुरु झालेल्या पावसाने शनिवारी दिवसभर मुक्काम ठेवल्याचे दिसून आले. तर मागील २४ तासात ठाण्यात १०४.१० मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर शनिवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३२.७४ मीमी पावसाची नोंद झाली. शहरात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले होते. तर शहरातील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर सिध्देश्वर तलाव परिसरात संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

ठाण्यात पावसाने आता मुक्काम करण्यास सुरवात केली आहे. मागील काही दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे. त्यामुळे वातावरणात देखील कमालीचा गारवा पसरला आहे. शुक्रवारी रात्री पासून पावसाने शहराच्या विविध भागात दमदार हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे शुक्रवार ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत शहरात तब्बल १०४.१० मीमी पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळी पहिल्या सत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. तर दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३२.७४ मीमी पावसाची शहरात नोंद झाली. त्यामुळे शहरातील बारा बंगला परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, पेढ्या मारुती मंदिर, वंदना सिनेमा समोर आदींसह शहरातील इतर भागातही पाणी साचल्याचे दिसून आले. परंतु ठाण्यातील महत्वाच्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी या पाण्यातून वाटसरुना मार्ग काढून देतांना दिसून आले. तर ठिकठिकाणी महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी लावलेल्या पंपामुळे पाणी फार वेळ साचून राहिले नसल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले.

दुसरीकडे याच पावसात सकाळी सिध्देश्वर तलाव परिसरात मिताली बिल्डींग समोर रस्त्याची सुरक्षा भिंत पडल्याची घटना घडली. ही भिंत २० फुट लांब तर १० फुट उंच होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या इमारतीचा धोकादायक झालेला भागही पाडण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी देखील सुरक्षेच्या कारणास्तव याठिकाणी धोका पट्टी लावण्यात आली होती.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस