शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी; सखल भागात साचले पाणी, वाहतूक कोंडीत पडली भर

By अजित मांडके | Updated: September 8, 2022 19:11 IST

शहरातील बहुतेक भागात वाहतूक कोंडी जाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: मागील काही दिवस दडी मारुन बसलेल्या पावसाने बुधवारी नंतर गुरवारी देखील संदयकाली जोरदार हजेरी लावली. ५.३० च्या सुमारास विजेच्या कडकडांटसह पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. अचानक अंधार मोठय़ा प्रमाणात वाढला आणि जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तर शहरातील बहुतेक भागात वाहतूक कोंडी जाली होती.

गुरुवारी सायंकाळी ५ नंतर सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाऊस पडला. मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील नौपाडा, गोखले रोड, वंदना बसथांबा, लोकमान्यनगर या भागात गुडघाभर पाणी साचले होते. लोकमान्य नगर येथील एका रस्त्याला नदीचे रुप आले होते. तर, नौपाडा येथील सखल भागातील दुकानांमध्ये  पाणी शिरले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही फटका बसला. 

अचानक झालेल्या पावसामुळे कामाहून घरी परतणाऱ्या नोकदारांचीही तारांबळ उडाली. शहरात ठाणे बेलापूर मार्गावर कळवा ते विटावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नवी मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड टोलनाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच घोडबंदरसह शहरातील अंतर्गत मार्गांवरही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिकांना वेळेत घरी पोहचता आले नाही. 

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस