शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चिरनेर -दिघाटी दरम्यानच्या सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरच थेट अवजड डंपर कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 18:26 IST

चिरनेर -दिघाटी दरम्यानच्या सिडकोच्या हेटवणे धरणाच्या दिड मीटर व्यासाच्या जलवाहिनीवर अवजड डंपर कोसळला आहे.

मधुकर ठाकूर

उरण : चिरनेर -दिघाटी दरम्यानच्या सिडकोच्या हेटवणे धरणाच्या दिड मीटर व्यासाच्या जलवाहिनीवरअवजड डंपर कोसळला आहे.यामुळे जलवाहिनी फुटल्याने २०० फुट उंचीवर पाणी उसळून लाखो लिटर्स पाणी वाया गेले आहे.जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवारी (१०) पेण, पनवेल,उलवा, खारघर, द्रोणागिरी परिसरातील पाणीपुरवठा ८ तास बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती या विभागाचे अधिक्षक अभियंता प्रतिक मुल यांनी दिली.

 पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबई, खारघर,उरण येथील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिडकोची चिरनेर - गव्हाण फाटा रस्त्यालगत सुमारे दिड मिटर व्यासाची पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे. चिरनेर -दिघाटी दरम्यानच्या रस्त्यावरुन जाताना मंगळवारी (१०) दुपारी २.१५ ते २.४५ वाजताच्या दरम्यान भरधाव वेगाने जाणारा  अवजड डंपर पलटी होऊन कोसळला आहे. अवजड डंपर थेट दिड मीटर व्यासाच्या उच्च दाबाच्या जलवाहिनीवरील व्हॉल्ववर कोसळल्याने फुटलेल्या जलवाहिनीमधुन सुमारे २०० फुट उंचीपर्यंत पाण्याचा लोंढा उठला होता.यामुळे लाखो लिटर्स पाणी वाया गेले आहे.रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सदर घटनेची माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच पाईप लाईनमधून सुरु असणारा पाणी पुरवठा बंद केला आहे.

दरम्यान जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी ८ तास पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती  या विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रतिक मुळ यांनी दिली.या हेटवणे धरणाच्या पाणीपुरवठा योजनेतुन पेण, पनवेल,उलवा, खारघर, द्रोणागिरी, नवीमुंबई परिसरात पाणी पुरवठा केला जातो.नवी मुंबई परिसरातील नागरिकांना याआधीच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.त्यानंतर पाणी कपातीचे संकट उभे ठाकले आहे.त्यानंतर आता पाणीपुरवठा ८ बंद राहणार असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :thaneठाणे