शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

पाच दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप; १७ हजार मूर्तींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:57 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कायम आहे. सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या केलेल्या विनंतीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

ठाणे : ठाण्यात पाच दिवसांच्या १६ हजार ८१५ गणेशमूर्तींचे बुधवारी नियम पाळत विसर्जन करण्यात आले. यामध्ये १६ हजार ७३७ घरगुती आणि ७८ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश होता. शहरांतील विसर्जन घाट कृत्रिम तलावात शांतपद्धतीने गणरायाला निरोप दिला गेला. तर अनेकांनी गणेशमूर्तींचे आपापल्या घरातच विसर्जन केले. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलाव परिसरातही काहीसा शुकशुकाट होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कायम आहे. सरकारने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या केलेल्या विनंतीला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना दरवर्षीपेक्षा कमी झाली असली तरी ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरात सुमारे एक हजार सार्वजनिक तर सुमारे दीड लाख घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. रविवारी २६७ सार्वजनिक आणि सुमारे ४० हजार दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे जिल्ह्याच विसर्जन झाले. तर बुधवारी पाच दिवसांच्या १६ हजार ८१५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. बुधवारी ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा शहरात ३५ सार्वजनिक आणि ४ हजार ४३५ घरगुती, भिवंडीत ९ सार्वजनिक २२९ घरगुती, कडोंमपात २१ सार्वजनिक, ६५१० घरगुती, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये १३ सार्वजनिक तर ५ हजार ३७२ घरगुती मूर्तींचे विसर्जन झाले. अनेकांनी घरगुती गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन केले.ना ढोलताशे, ना गर्दीकायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विसर्जन घाट आणि कृत्रिम तलाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. अत्यंत साधेपणाने मास्क बांधून तीन ते चार भाविक विसर्जन घाटावर येत होते. ढोलताशे किंवा ध्वनिक्षेपक नसल्याने प्रदूषणही झाले नाही. गर्दी नसल्याने पोलिसांच्या बंदोबस्ताचा ताणही काहीसा हलका झाला होता.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसGanesh Mahotsavगणेशोत्सव