शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयात हृदयरोग उपचार केंद्र; रुग्णालयाचा करणार कायापालट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 01:03 IST

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, उपचार केंद्रामध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी हृदयासंबंधीच्या सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध आहेत.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये हळूहळू जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत असून, काही दिवसांत त्याचा कायापालट करण्याची ग्वाही राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

आनंद दिघे यांच्या जयंती दिवसाचे औचित्य साधून माजी महापौर व नगरसेविका मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या पुढाकाराने निर्माण केलेल्या हृदयरोग उपचार केंद्राचे लोकार्पण बुधवारी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र पाठक, उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय देवराम भोईर, सभागृह नेते अशो‍क वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, क्रीडा व समाज कल्याण व सांस्कृतिक कार्य समिती सभापती प्रियंका पाटील, आरोग्य परीक्षण व वैद्यकीय समिती अध्यक्ष निशा पाटील, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॅा. भीमराव जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा. मुरुडकर, प्लॅटिनम हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॅा. संजित पॅाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांका पॉल आदी उपस्थित होते. 

विनामूल्य सुविधाउपचार केंद्रामध्ये सर्वसामान्य रुग्णांसाठी हृदयासंबंधीच्या सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध आहेत. यामध्ये टू डी ईकोपासून ते ॲन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी, स्टेन्ट टाकणे, याशिवाय बायपास शस्त्रक्रियेसह तद‌्नुषंगिक विविध उपचार हे विनामूल्य दिले जाणार आहेत. 

१०० बेड्सची योजना महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अधीन असणाऱ्या नागरिकांना हे उपचार मोफत देण्यात येणार आहेत. तसेच अन्य नागरिकांना अतिशय नाममात्र दरात हृदयरोगासंबंधीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या रोग उपचार केंद्रामध्ये १०० बेड्सची योजना असून, यातील ७० बेड्स कार्यान्वित केले आहेत. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेhospitalहॉस्पिटल