भिवंडी पालिकेतील आरोग्य निरीक्षक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:42 AM2021-05-08T04:42:35+5:302021-05-08T04:42:35+5:30

भिवंडी : भिवंडी पालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पालिका कार्यक्षेत्रात स्वच्छता व जंतुनाशक औषध फवारणी करणे आवश्यक ...

Health Inspector of Bhiwandi Municipality suspended | भिवंडी पालिकेतील आरोग्य निरीक्षक निलंबित

भिवंडी पालिकेतील आरोग्य निरीक्षक निलंबित

Next

भिवंडी : भिवंडी पालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पालिका कार्यक्षेत्रात स्वच्छता व जंतुनाशक औषध फवारणी करणे आवश्यक असताना आरोग्य विभागातील काही अधिकारी, कर्मचारी, आरोग्य निरीक्षक या कामांमध्ये कुचराई करीत आहेत. वरिष्ठांना स्वच्छतेसंदर्भात खोटा अहवाल व चुकीची माहिती देत असल्याची बाब काही नागरिकांनी भिवंडी पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांच्या निदर्शनास आणून दिली. आयुक्तांनी चौकशी करुन प्रभाग समिती क्रमांक ४ चे आरोग्य निरीक्षक जयवंत सोनवणे यांना पालिका उपायुक्तांनी बुधवारी तडकाफडकी निलंबित केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आरोग्य निरीक्षक सोनवणे यांनी प्रभाग समिती क्षेत्रात विशेष स्वच्छता मोहीम न राबविता तसेच जंतुनाशक औषध फवारणी न करता मनमानी काम करून वरिष्ठांना चुकीची व खोटे अहवाल सादर केले. त्यामुळे यासंदर्भात केलेल्या चौकशीत ते दोषी आढळल्याने त्यांना निलंबित केल्याची माहिती उपायुक्त दीपक झिगाड यांनी दिली आहे.

Web Title: Health Inspector of Bhiwandi Municipality suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.