शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या जय अंबे नगर मधील आरोग्य केंद्र ६ महिन्यां पासुन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 21:43 IST

महापालिकेच्या आरोग्य केंद्रा मुळे रहिवाशांना नाममात्र शूल्कात वैद्यकिय सुविधा मिळत असल्याने मोठा दिलासा मिळतो.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे भाईंदर पश्चिमेच्या जय अंबे नगर झोपडपट्टीतील आरोग्य केंद्र गेल्या ६ महिन्यां पासुन दुरुस्तीसाठी बंद असल्याने नागरिक वैद्यकिय सुविधे पासुन वंचीत आहेत.जय अंबे नगर मध्ये झोपडपट्टी आणि गलिच्छ वस्ती असुन या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य केंद्रा मुळे रहिवाशांना नाममात्र शूल्कात वैद्यकिय सुविधा मिळत असल्याने मोठा दिलासा मिळतो. परंतु दुरुस्तीसाठी म्हणुन सदरचे आरोग्य केंद्र गेल्या ६ महिन्यां पासुन बंद आहे. आत मध्ये नविन साहित्य आदी आणलेले आहे. रंगरंगोटी झालेली आहे. पण दुरुस्तीचे काम बाकी असल्याने आरोग्य केंद्र सुरु केले गेले नसल्याचे कारण पुढे केले जात असले तरी सुत्रांनी मात्र पालिके कडे पुरेसे वैद्यकिय अधिकारी नसल्याने सदरचे आरोग्य केंद्र सुरु केले जात नसल्याचे सांगण्यात आले.आरोग्य केंद्रात एका बाजुस सदद्या लहान बालकांसाठी लसीकरण सुरु केले गेले आहे. परिचारीका असतात. परंतु रुग्णांवर उपचार मात्र अद्याप सुरु केले गेले नाहित. रहिवाशी विचारणा करायला गेले की, २६ जानेवारी सुरु केले जाईल असे उत्तर सुध्दा ऐकायला मिळते. तर कधी विद्युत काम बाकी असल्याचे सांगीतले जाते असे स्थानिक रहिवासी म्हणाले. आरोग्य केंद्र बंद असल्याने नाईलाजाने खाजगी डॅक्टरां कडे जावे लागते. ते खुपच जास्त पैसे घेत असल्याने आम्हाला परवडत नाही असे रहिवासी म्हणाले.डॉ. प्रमोद पडवळ ( मुख्य वैद्यकिय अधिकारी ) - आपण स्वत: या आरोग्य केंद्राची पाहणी केली आहे. स्वच्छता गृहाचे काम अजुन बाकी असुन ते पुर्ण झाले की केंद्र सुरु केले जाईल.गणेश बामणे ( स्थानिक रहिवाशी ) - आरोग्य केंद्राची रहिवाशांना खुपच गरज आहे. कारण येथे रुग्णांची संख्या नेहमीच जास्त असते. गरीब गरजुंना खाजगी डॉक्टर परवडत नाही. ६ महिने झाले तरी आरोग्य केंद्र का सुरु झाले नाही याचे नेमके कारण प्रशासन व नगरसेवक देखील सांगत नाहित. यातुन त्यांची वैद्यकिय सेवे बद्दलची अनास्था दिसुन येते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक