शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

लॉकडाऊनमुळे बिघडले 225 मनोरुग्णांचे आरोग्य, उपचारासाठी पुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:42 IST

Thane News : गतवर्षी मनोरुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडलेले आणि दर महिन्याला उपचारासाठी येत असलेल्या त्या २२५ जुन्या मनोरुग्णांच्या उपचारात लॉकडाऊनमुळे खंड पडल्याने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा दाखल केले आहे

ठाणे : गतवर्षी मनोरुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडलेले आणि दर महिन्याला उपचारासाठी येत असलेल्या त्या २२५ जुन्या मनोरुग्णांच्या उपचारात लॉकडाऊनमुळे खंड पडल्याने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात पुन्हा दाखल केले आहे, तर लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट कोसळल्याने नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या २५ नवीन रुग्ण मनोरुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत आहे.लॉकडाऊनचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर झाला आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातून बरे झालेल्या मनोरुग्णांना दर महिन्याला दैनंदिन तपासणीसाठी बोलविले जाते. लॉकडाऊनमध्ये वाहने बंद असल्याने या बरे झालेल्या मनोरुग्णांना तपासणीसाठी येत आले नाही. अनलॉक-१ सुरू झाले आणि २२५ जुन्या मनोरुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागले. त्यांच्या उपचारात खंड पडला आणि त्यांचा आजार पुन्हा बळावला. त्यामुळे २२५ मनोरुग्णांना पुन्हा उपचारासाठी दाखल करावे लागले, असे मनोरुग्णल्याचे अधीक्षक डॉ. संजय बोदाडे यांनी सांगितले. यात १२० पुरुष, तर १०५ महिला असून आतापर्यंत ९७७ मनोरुग्ण उपचार घेत आहेत.लॉकडाऊन आधी ७००च्या आसपास मनोरुग्ण उपचार घेत होते. लॉकडाऊन काळात बेरोजगारी वाढली, त्यामुळे नैराश्य आले, चिडचिड, अतिराग, आत्महत्येचा विचार मनात येऊ लागले त्यामुळे अशा रुग्णांमध्येदेखील वाढ झाली. २५ नवीन रुग्ण बाह्यविभागात उपचारासाठी येत आहेत. नवीन वाढलेल्या त्या २५ मनोरुग्णांचे समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच, त्यांना औषधोपचारदेखील दिले जात असल्याचे डॉ. बोदाडे म्हणाले.मनोरुग्णांसाठी ठामपाने पुढाकार घेण्याची गरजकोविडमुक्त रुग्णांसाठी ठाणे महापालिकेने पोस्ट कोविड सेंटर सुरू करून उपचार देणे सुरू केले आहे. यामुळे कोरोनामुक्त होऊनही केवळ लाॅकडाऊनमुळे पुन्हा ॲडमिट झालेल्या मनोरुग्णांना ठाणे महापालिकेने आधार देण्याची गरज आहे. त्यासाठी स्वत:हून पुढाकार घेऊन मनोरुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून या रुग्णांना ठाणे महापालिकेने आधार द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयthaneठाणे