शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकावर खूनी हल्ल्यासाठी मुख्याध्यापकानेच दिली दहा हजारांची सुपारी: तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:04 IST

शिक्षकावर खूनी हल्ल्यासाठी मुख्याध्यापकानेच सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी तिघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. यातील सूत्रधार मुख्याध्यापक रमेश मिश्रा हा मात्र अद्यापही पसार आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाकडे शाळेच्या गैरव्यवहाराच्या तक्रारी केल्याचा रागतलवार आणि लोखंडी रॉडने केला होता हल्लासूत्रधार मुख्याध्यापक अद्यापही पसार

ठाणे: आपल्याविरुद्ध शिक्षण विभागाकडे तक्रार करणा-या महाजन प्रजापती या शिक्षकावर खूनी हल्ला करण्यासाठी ठाण्याच्या ज्ञानोदय हिंदी विद्यालयाचा मुख्याध्यापक रमेश मिश्रा यानेच दहा हजारांची सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी रोशन सिंग (२०), विशाल मोरे (१९) आणि प्रकाश चाळके (२०) या तिघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे.सावरकरनगरातील ज्ञानोदय विद्यालयाचा मुख्याध्यापक मिश्रा याने ३ डिसेंबर रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास हा हल्ला घडवून आणला होता. त्यावेळी प्रजापती यांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरूद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.ज्ञानोदयमध्ये कनिष्ठ शिक्षक म्हणून नोकरीवर असलेल्या प्रजापती यांनी मिश्रा यांच्याविरुद्ध शाळेतील गैरव्यवहाराबाबत शिक्षण विभागासह अन्य खात्यांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. मिश्रा हे नऊ वर्षांपासून शाळेत एकही दिवस हजर न राहता केवळ मस्टरवर सह्या करून वेतन घेत असल्याची प्रजापती यांची तक्रार होती. मिश्रा यांचे वागळे इस्टेटमध्ये स्वत:चे विद्यालय असून, त्यांचा शिक्षकांना त्रास असल्याचा गंभीर आरोपही प्रजापती यांच्यासह आणि अन्य तक्रारदारांनी केला होता.या पार्श्वभूमीवर ३ डिसेंबर रोजी रात्री प्रजापती जेवण झाल्यानंतर सावरकर नगरातील पानाच्या दुकानावर गेले होते. त्याचवेळी चौघांनी त्यांच्यावर खूनी हल्ला केला होता. तलवारीने केलेल्या मारहाणीत प्रजापती गंभीर जखमी झाले. यावेळी मुख्याध्यापक मिश्राही तिथे होते. याप्रकरणी पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. आंब्रे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश बसवंत यांच्या पथकाने शिक्षकावर तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला करणारे रोशन आणि विशाल या दोघांना आधी अटक केली. त्यांच्याकडील सखोल चौकशीत चाळके याला गुरुवारी अटक केली. कोणताही धागादोरा नसतांना खबरी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे या तिघांनाही अटक केल्याची गिरधर यांनी सांगितले. यातील मुख्य सूत्रधार मुध्याध्यापक मिश्रा हा मात्र अजूनही पसार असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले........................हल्लेखोर प्रकाश चाळके यानेच या खूनी हल्ल्यासाठी ही दहा हजारांची सुपारी घेतली. तर रोशनच्या वडीलांचे कॅन्टीन ज्ञानोदय विद्यालयात आहे. त्यामुळे त्याचे या शाळेत येणे जाणे होते. याच ओळखीतून प्रजापतीवर हल्ला करण्यासाठी प्रकाश आणि रोशन यांनी मान्य केल्याची कबूली पोलिसांना दिली.

टॅग्स :thaneठाणेPolice Stationपोलीस ठाणेCrimeगुन्हा