शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'जो वाचन करतो, तो वाया जात नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 08:55 IST

मराठी भाषेसाठी जी आव्हाने आहेत, त्यामध्ये मराठी ही ज्ञानार्जनाची आणि अर्थाजनाची भाषा नसल्याने, मराठी समोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत.

- अभिजीत बांगरआयुक्त, ठाणे महापालिकालोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वाचन कसे केले पाहिजे, कुठली पुस्तके वाचली पाहिजे, कशी वाचली पाहिजेत, याच्या अनेक थेअरी आहेत, यामध्ये वेळ महत्त्वाचा नाही, प्रत्येक व्यक्तीला जसे भावेल तसे त्याने वाचन केले पाहिजे. जो माणूस वाचन करतो तो माणूस वाया जात नाही. 

आनंदासाठी वाचत असाल तर ती महत्त्वाची बाब आहे. कारण आपल्या विचारात प्रगल्भता आणायची, किंवा अर्थार्जनासाठी आपण वाचतो तर ते अयोग्य नाही, परंतु ते कितपत यशस्वी होईल याबद्दल शाश्वती नाही. मराठीच्या बाबतीत असे बोलले जाते की, मराठी भाषेसाठी जी आव्हाने आहेत, त्यामध्ये मराठी ही ज्ञानार्जनाची आणि अर्थाजनाची भाषा नसल्याने, मराठी समोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत.

मॉलमध्ये पुस्तक प्रदर्शन ही कौतुकास्पद कल्पनामॉलमध्ये पुस्तक प्रदर्शन ही फार वेगळी कल्पना आहे, कारण या ठिकाणी येणारा वर्ग हा वेगळा आहे, बऱ्याच मॉलमध्ये क्रॉसवर्ड आहे, अशा ठिकाणी जाऊन पुस्तके वाचा, खरेदी करा. पुस्तकांचे प्रदर्शन पाहणे ही निश्चित सुखकारक बाब आहे. या पुस्तक प्रदर्शनाला कुसुमाग्रजांचे नाव देणे हे कौतुकास्पद असून याला दुसरे समर्पक नाव असूच शकत नाही. 

सोशल मीडियावर पुस्तकांची थप्पी नकाे वाचनाचा आनंद ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. वाचनाबाबत माझा दोन वर्षांचा अनुभव असा आहे की, वाचनापाशीच ती गोष्ट संपली की, त्याचा पूर्णत्वाने फायदा होईल, असे नाही. वाचनामध्ये ललित लेखनापासून ते अगदी आपल्या व्यवसायाशी निगडित, टेक्नॉलॉजीशी संबंधित पुस्तके वाचा. परंतु जोपर्यंत तुम्ही त्या पुस्तकांशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याची आवड निर्माण होणार नाही. सोशल मीडियातही पुस्तक एक प्रदर्शनाचा भाग झाला आहे, पुस्तक वाचायचे सोशल मीडियावर टाकायचे, पुस्तकाची थप्पी एका वर्षात वाचली, असे अभिमानाने मिरवायचे. तीच थप्पी सोशल मीडियावर टाकणार नसाल, तर तुम्ही नक्की वाचाल. वाचन संस्कृतीबाबत आपण अनेकदा चर्चा करतो, चर्चासत्र घडवून आणतो; पण प्रत्यक्षात वाचन करतो का? हा प्रश्न आपण स्वत:ला विचारत नाही.

टॅग्स :Lokmatलोकमत