शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

तो इथेच शेतात लपला होता! सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याबाबत समोर आली धक्कादायक माहिती

By जितेंद्र कालेकर | Updated: January 20, 2025 11:11 IST

Saif Ali Khan Attack News: एकीकडे मुंबई पाेलिसांचे पथक ठाण्याच्या कासारवडवली पाेलिसांच्या मदतीने अभिनेता सैफ अली खानच्या हल्लेखाेराचा शाेध घेत हाेते. त्याचवेळी हल्लेखाेर मात्र हिरानंदानी इस्टेटमधील मेट्राे रेल्वे प्रकल्प मजुरांच्या काॅलनीमागील वांग्याच्या शेतात लपला हाेता.

- जितेंद्र कालेकर ठाणे - एकीकडे मुंबई पाेलिसांचे पथक ठाण्याच्या कासारवडवली पाेलिसांच्या मदतीने अभिनेता सैफ अली खानच्या हल्लेखाेराचा शाेध घेत हाेते. त्याचवेळी हल्लेखाेर मात्र हिरानंदानी इस्टेटमधील मेट्राे रेल्वे प्रकल्प मजुरांच्या काॅलनीमागील वांग्याच्या शेतात लपला हाेता. आपणच पहाटे तीनच्या सुमारास आरोपी शरीफूल इस्लाम शहजादला जेरबंद करण्यात पाेलिसांना मदत केली, असा दावा शेतमालक माेनिष ऊर्फ माेनू मणेरा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

हल्लेखाेराचे टाॅवर लाेकेशन ठाणे रेल्वे स्टेशनपासून आठ किलाेमीटरवर असलेल्या  ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेटजवळील मेट्राे प्रकल्प कामगारांच्या वसाहतीमध्ये दर्शवण्यात येत होते. त्यामुळेच शनिवारी सायंकाळी सातपासून ते रविवारी पहाटे तीनपर्यंत तो संपूर्ण परिसर मुंबई पाेलिसांनी पिंजून काढला. काॅलनीतील ४० ते ५० घरांमध्ये सर्च ऑपरेशनही राबवण्यात आले. एका घरात आठ ते दहा मजूर दाटीवाटीत राहतात.  सर्वच घरांमध्ये मजुरांचे माेबाइल, आधार कार्डसह इतर कागदपत्रे पोलिसांनी तपासली. त्यांचाकडे कसून चाैकशी करण्यात आली, मात्र त्यांपैकी काेणालाही आरोपीबद्दल काहीही सांगता येईना. 

आरोपी वांग्याची झुडूपे अंगावर घेऊन लपला होता. पाेलिसांना त्याच्या माेबाइलचे लाेकेशन मिळूनही तो हाती लागत नव्हता. झडुपांची हालचालीवरून तो तिथे लपला असल्याचा अंदाज मी बांधला. - माेनिष ऊर्फ माेनू मणेरा, शेतमालक  

मीच आरोपीवर झडप घातलीवांग्याच्या मळ्यात पोलिस पथक आरोपीचा शाेध घेत होते. मीही त्यांना मदत करीत होतो. वांग्याच्या झुडुपाआड लपलेल्या आरोपीवर मी झडप घातली, यावेळी मला किरकोळ जखम झाली. आरोपीने सैफ अली खानवर यांच्यावर हल्ला केल्याची माहिती आपल्याला नंतर पाेलिसांकडून समजली, असा दावा मोनिष यांनी केला. 

आमच्या साहेबांवर हल्ला केला आहे...पोलिसांनी शोध मोहीम सुरू असतानाच आरोपीचे टाॅवर लाेकेशन मात्र मजुरांच्या वसाहतीच्या मागे असलेल्या दाट जंगलातील वांग्याच्या मळ्यात दाखवले जात हाेते. या शेताचे मालक माेनिष घरात स्वयंपाक करीत असतानाच मुंबई पाेलिसांचे पथक तेथे धडकले. पोलिसांनी चाैकशी सुरू करताच मोनिष यांनी हे आपलेच घर आणि शेत असल्याचे त्यांना सांगितले. आमच्या साहेबांवर एका चाेरट्याने हल्ला केल्याचे पाेलिसांनी त्यांना सांगितले आणि आरोपीचा फोटो दाखवला. त्यावर आरोपीला ओळखत नसल्याचे माेनिष यांनी पोलिसांना सांगितले. 

टॅग्स :Saif Ali Khanसैफ अली खान thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी