शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या जीवाची काळजी न करता ‘त्यांनी’ रुग्णांना काढले बाहेर; धुरामुळे घुसमटला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 23:34 IST

धुरामुळे घुसमटला जीव : लोखंडाच्या खिडक्या तोडल्या

कुमार बडदेमुंब्रा : येथील प्राइम क्रिटीकेअर रुग्णालयाच्या तळ मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात आतमध्ये जाण्यासाठी तसेच बाहेर येण्यासाठी एकच प्रवेशद्वार आहे. पहिल्या माळ्यावर लागलेल्या आगीचा धूर काही क्षणातच तळ मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात पसरला. या धुरामुळे उपचारांसाठी दाखल असलेले सहा रुग्ण तसेच त्याच्यांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांचा जीव घुसमटला होता.  

प्रवेशद्वारातदेखील धूर पसरला होता. यामुळे आतमध्ये जाऊन रुग्णांना बाहेर काढण्यासाठी कुणीही धजावत नव्हते. यामुळे जीव वाचविण्यासाठी रुग्णांचा आक्रोश क्षणाक्षणाला वाढत होता.  धुरामुळे मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढणे शक्य नसल्याचे लक्षात येताच रुग्णालयाच्या जवळच असलेल्या जहूर चाळीतील आवेश मुजावर, फैसल अन्सारी, जमिर नाखवा, तनवीर मलिक, सरवेज मुजावर, रशीद अन्सारी, इब्राहिम खान यांनी रुग्णालयाच्या मागे असलेल्या खिडकीच्या काचा फोडून, लोखंडाच्या खिडक्या तोडून रुग्णांना बाहेर काढले.

... वाचवू न शकल्याची खंत : नाखवा

रुग्णांना बाहेर काढण्यासाठी आतमध्ये गेलेल्या इब्राहिम, सवरेज यांचीही घुरामुळे घुसमट होत होती. परंतु, त्यांनी तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी त्याची तमा न बाळगता अतिदक्षता विभागातील रुग्णांना बाहेर काढले. ज्यांना बाहेर काढले त्यापैकी चौघांचा नंतर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे कळताच त्यांनी हळहळ व्यक्त करून त्यांना वाचवू न शकल्याबद्दल खंत व्यक्त केली. ज्यांचा मृत्यू झाला त्यांना जर वेळेत बाहेर काढून त्यांच्यावर त्वरित उपचार केले असते तर ते वाचले असते, असे नाखवा म्हणाले.

टॅग्स :thaneठाणेfireआग