शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लाखमोलाची नोकरी सोडून त्याने दिली ‘यूपीएससी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 00:30 IST

करुण गरड ६५६ क्रमांकासह यशस्वी; देशसेवा करण्याची इच्छा

ठाणे : आपल्या देशाची, आपल्या राज्याची समाजसेवा करण्याचा निश्चय करीत ठाणेकर करुण गरड याने आपली इंजिनीअरिंग क्षेत्रातील लाखमोलाची नोकरी सोडून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. या परीक्षेत तो यशस्वी झाला असून त्याला देशभरातून ६५६ क्रमांक मिळाला आहे.ठाण्यातील शिवाईनगर येथे सामान्य घरात आणि आई-वडील, भाऊ आणि बहीण अशा पाच जणांच्या कुटुंबात मोठा झालेला करुण याचे शालेय शिक्षण थिराणी विद्यामंदिर, तर महाविद्यालयीन शिक्षण वझे-केळकर महाविद्यालयातून पूर्ण झाले आहे. त्याने बीई आणि पुढे आयआयटी मद्रास येथून एमटेक पदवी मिळविलेली आहे. त्यानंतर तो एका खाजगी कंपनीत इंजिनीअर म्हणून नोकरी करीत होता. मात्र सामाजिक कार्याची आवड असल्याने त्याचे मन नोकरीत रमत नव्हते. शेवटी त्याने चांगली नोकरी सोडून २०१६ मध्ये एमपीएससी परीक्षा दिली. त्यात तो उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने यूपीएससीची परीक्षा दिली. त्यात तो उत्तीर्ण झाला; मात्र अपेक्षित गुणांकन मिळत नसल्याने त्याने पुन्हा परीक्षा दिली.दरम्यान, आर्थिक परिस्थिती काहीशी बिघडल्याने त्याने आरबीआयसाठीची परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण झाल्यावर तेथे नोकरी सुरू केली. मात्र, देशसेवा करण्याचा त्याचा निश्चय ठाम आहे.पुन्हा परीक्षा देण्याचा विचारकरुणचे वडील महसूल विभागातून निवृत्त झाले आहेत. तर, आई गृहिणी आहे. करुण याची पत्नीही गृहिणी असून तीही आपल्या पतीचा आदर्श ठेवत यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत आहे. तर, करुणही अजून वरचा क्रमांक मिळविण्यासाठी पुन्हा एक प्रयत्न करण्याच्या विचारात आहे.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग