शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मानसिक विकृतीतून ‘त्याने’ केला ठाण्याच्या महापौरांना दाऊदच्या नावाने धमकीचा फोन

By जितेंद्र कालेकर | Updated: September 20, 2019 22:44 IST

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावाने ठाण्याच्या महापौरांना धमकी देणाऱ्या वासिम सादिक मुल्ला (रा. मुंब्रा) याला खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. एनसी प्रकरणात अटक करता येत नसल्यामुळे याप्रकरणी अश्लील संभाषण करणे तसेच फोनवरुन ठार मारण्याची धमकी देणे या कलमांखाली गुन्हा दाखल करुन कापूरबावडी पोलिसांनी त्याला शुक्रवारी अटक केली.

ठळक मुद्देनव्याने केला गुन्हा दाखल खंडणी विरोधी पथकाने घेतले ताब्यातकापूरबावडी पोलिसांनी केली अटक

ठाणे : ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना कुप्रसिद्ध गँगस्टर दाऊद इब्राहिम कासकर तसेच छोटा शकीलच्या नावाने उचलून नेण्याची धमकी देणा-या वासिम सादिक मुल्ला (रा. मुंब्रा) याला मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. त्यानंतर, विनयभंग आणि ठार मारण्याची धमकी देणे, या कलमांखाली नव्याने गुन्हा दाखल करून त्याला कापूरबावडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.प्राथमिक चौकशीमध्ये तो आठ वर्षे सौदी अरेबियामध्ये वास्तव्याला होता. तिथे तो एका कार्यालयात शिपायाचे काम करीत होता. त्याचे वडीलही तिथेच नोकरीला होते. वडिलांच्या निवृत्तीनंतर तो मुंब्य्रात आला. सध्या त्याला कोणतेही काम नव्हते. गुगलवरून त्याने यापूर्वीही काही नगरसेविका तसेच महिलांचे मोबाइल क्रमांक शोधून अशाच प्रकारे धमकी तसेच अश्लील संभाषणाचे प्रकार केल्याचीही कबुली दिली. कोणताही कामधंदा नाही. त्यात क्षय आजारानेही तो ग्रस्त आहे. मानसिक विकृतीतून तो असे प्रकार करीत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. दरम्यान, त्याला तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुंब्रा भागातून ठाणे खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे आणि विकास घोडके यांच्या पथकाने ताब्यात घेतल्याचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.* म्हणून नव्याने केला गुन्हा दाखलसुरुवातीला याप्रकरणी केवळ फोनवरून धमकी दिल्याच्या कलम ५०७ प्रमाणे अदखलपात्र गुन्हा १७ सप्टेंबर रोजी दाखल झाला आहे. परंतु, एनसी प्रकरणात अटकेची कारवाई होत नाही. त्याच्या संभाषणाची क्लिपही पोलिसांनी पुन्हा पडताळली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शुक्रवारी पुन्हा महापौर मीनाक्षी शिंदे यांना ठार मारण्याची धमकी दिल्याची (५०६ भाग २) तसेच अश्लील संभाषण करणे (भारतीय दंड विधान कलम ५०९) अंतर्गत कापूरबावडी पोलीस ठाण्यात येऊन याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याच कलमान्वये वासिम याला शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला शनिवारी ठाणे न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.असा मिळविला मोबाइल...वासिम याची एक मैत्रीण मुंब्रा येथील करुन्नम कुरेशी या गृहिणीकडे घरकामाचे काम करीत होती. तिने कुरेशी यांचा मोबाइल काही दिवसांपूर्वी चोरला होता. हा मोबाइल वासिमने तिच्याकडून विकत घेतला. कोणत्याही कागदपत्राविना मिळविलेल्या मोबाइलच्या सीमकार्डमधून आता कोणालाही धमकी देता येईल, कोणत्याही महिलेशी अश्लील संभाषण करता येईल, असा समज वासिमचा होता. यातूनच त्याने महापौर शिंदे यांच्यासह अनेक महिलांशी विचित्रपणे संभाषण केले. महापौरांशी संभाषण करताना तर त्याने कळसच गाठला. थेट दाऊदचे नाव घेऊन त्यांना उचलून नेण्याची भाषा त्याने वापरली. ठाणे पोलिसांनीही अवघ्या ४८ तासांत या प्रकरणाचा छडा लावून त्याला जेरबंद केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMayorमहापौर