शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झोपड्या येणार कराच्या कक्षेत : सर्वेक्षणासाठी कंत्राटावर नेमणार ३४ लिपिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:29 IST

मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात २००० नंतरच्या झोपड्यांना कर आकारणी करणे आवश्यक असल्याने त्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात २००० नंतरच्या झोपड्यांना कर आकारणी करणे आवश्यक असल्याने त्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. त्याच्या सर्वेक्षणासाठी पालिकेने थेट कंत्राटी पद्धतीवर ३४ लिपीकांची नियुक्ती होणार आहे.एका बाजूला झोपडीधारक कर आकारणीसाठी पालिकेत सतत हेलपाटे मारत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्या झोपडीला कर आकारणी केली जात नसल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यांपूर्वी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार झोपडीधारकांना दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करण्याचा फतवा प्रशासनाने काढला होता. परंतु, त्याची प्रक्रिया पालिकेनेच सुरू केली नसल्याची बाब सह दुय्यम निबंधक वर्ग २, ठाणे क्र. १० कार्यालयाने लेखी स्वरुपात दिली. यावरून पालिकेचा कर आकारणीकरिता झोपडी नोंदणीचा फतवा कूचकामी ठरला.पालिकेने सरसकट सर्वच झोपड्यांना मालमत्ता कराच्या कक्षात आणण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेतला. त्यानुसार शहरातील एकूण १३ हजार २२२ झोपड्यांपैकी २००० नंतरच्या सुमारे ६ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू केले. तसा ठराव तत्कालिन महासभेत मंजूर करण्यात आला. बेकायदा ठरलेल्या झोपड्यांना वीज पुरवठ्यासाठी पालिकेचा ना हरकत दाखला आवश्यक असतानाही तो काहींनी न घेताच वीजजोडणी घेतली. तर काहींनी आर्थिक तडजोडीतून दाखला मिळवत जोडणी मिळवली. यानंतर सर्व झोपड्यांना कराची आकारणी करून त्यांना पायाभूत सुविधा पुरवण्यात याव्यात यासाठी राजकीय आंदोलने झाली. त्या दबावापोटी पालिकेने सार्वजनिक नळाद्वारे झोपडीधारकांना पाणीपुरवठा सुरू केला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक