शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

हस्तीदंताची तस्करी करणा-या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:42 IST

पुण्याच्या ग्रामीण भागातील एका पारध्याकडून घेतलेले हस्तीदंत एक ते दीड कोटींमध्ये विक्री करण्यासाठी गि-हाईकाच्या शोधात असलेल्या निलेश ननावरे (२५) आणि अजिंक्य बागल (२५, रा. दोघेही मंचर, पुणे) यांना कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली.

ठाणे : पुण्याच्या ग्रामीण भागातील एका पारध्याकडून घेतलेले हस्तीदंत एक ते दीड कोटींमध्ये विक्री करण्यासाठी गि-हाईकाच्या शोधात असलेल्या निलेश ननावरे (२५) आणि अजिंक्य बागल (२५, रा. दोघेही मंचर, पुणे) यांना कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून दहा लाख रुपये किंमतीचे हस्तीदंत हस्तगत करण्यात आले आहे.कासारवडवली परिसरात दोघेजण लाखो रुपये किंमतीचे हस्तीदंत विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे, सहायक आयुक्त महादेव भोर, वरिष्ठ निरीक्षक दत्ता ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, जमादार मधुकर कोठारे, हवालदार अंकुश पाटील, पोलीस नाईक महेंद्र लिंगाळे, प्रविण घोडके, संदीप सुरवसे आणि कॉन्स्टेबल दीपक बर्ले आदींच्या पथकाने २ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नीलेश आणि अजिंक्य यांना ज्ञानगंगा कॉलेजच्या शेजारी असलेल्या उन्नती ग्रीन सोसायटीच्या मेनगेटजवळ ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आंतरराष्टÑीय बाजारपेठेत अनुक्रमे सात लाख आणि तीन लाख रुपये किंमतीचे दोन हस्तीदंत हस्तगत केले. त्यातील एक सुमारे सव्वा किलोचा तर दुसरा सुमारे दीड किलो वजनाचे आहे. त्यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दोघांनाही ठाणे न्यायालयाने ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.दोघेही पुणे जिल्हयातील मंचर येथे वास्तव्यास असून चार वर्षांपूर्वी त्यांनी पारध्याकडून हे हस्तीदंत ३५ हजारांमध्ये खरेदी केले होते. घरातल्याच एका माळ्यावर त्यांनी ते ठेवले होते. बाजारामध्ये एक ते दीड कोटींमध्ये ते विकले जाऊ शकतात, अशी त्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या विक्रीसाठी गिºहाईकाच्या शोधात असतांनाच पोलिसांच्या हाती लागले.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणेPoliceपोलिस