शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा इमारतींवर हातोडा, न्यायालयाच्या आदेशामुळे कारवाईची ठाणे महापालिकेवर ओढवली नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:08 IST

उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या कडक आदेशानंतर मुंब्रा-शिळ परिसरातील १७ अनधिकृत इमारतींवर अखेर ठाणे महापालिकेने शुक्रवारी कडक पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केली. यातील पाच इमारतींमधील रहिवाशांना बाहेर काढून सायंकाळपर्यंत त्या जमीनदोस्त करण्यात आल्या.

ठाणे -  उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या कडक आदेशानंतर मुंब्रा-शिळ परिसरातील १७ अनधिकृत इमारतींवर अखेर ठाणे महापालिकेने शुक्रवारी कडक पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केली. यातील पाच इमारतींमधील रहिवाशांना बाहेर काढून सायंकाळपर्यंत त्या जमीनदोस्त करण्यात आल्या.

शुक्रवारी सकाळी न्यायालयीन अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत  या अनधिकृत इमारतींची पाहणी केली. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत या अनधिकृत इमारतींवर अतिक्रमण विभागामार्फत पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत १७ पैकी ५ इमारतींवर तोडक कारवाई केल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली.

याप्रकरणी उच्च न्यायालयाने ठाणे जिल्हा न्यायाधीशांना निर्देश दिले की, त्यांनी एक वरिष्ठ न्यायिक अधिकारी नियुक्त करून या बेकायदा बांधकामांकरिता जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करावी, त्यात महापालिकेचे अधिकारी व आयुक्त यांच्यासह शासकीय यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी.

चौकशी अहवाल सादर कराचौकशीचा अहवाल सहा आठवड्यांच्या आत सादर करावा. न्यायालयाने नेमलेला अधिकारी संबंधित व्यक्तींची साक्ष व नोटिसा देण्याची प्रक्रिया राबवू शकतो. असे न्यायालयाने सांगितले. 

न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली. याठिकाणी १७ इमारतींवर तोडक कारवाई केली जात आहे. या इमारतींमध्ये रहिवाशांना बाहेर काढून ही कारवाई केली जात आहे.- शंकर पाटोळे, अतिक्रमण विभाग उपायुक्त, ठाणे महापालिका

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका