शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

हाली बरफ हिला तहसीलदार कार्यालयात हंगामी नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:28 IST

भिवंडी : शहापूर तालुक्यातील शौर्य पुरस्कार विजेती हाली बरफ ही सध्या हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. लॉकडाऊनमुळे हंगामी स्वरूपात आश्रमशाळेत ...

भिवंडी : शहापूर तालुक्यातील शौर्य पुरस्कार विजेती हाली बरफ ही सध्या हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. लॉकडाऊनमुळे हंगामी स्वरूपात आश्रमशाळेत मिळालेली नोकरीही आश्रमशाळा बंद असल्याने गेली, तर शिधा वाटपपत्रिकेची ऑनलाइन नोंद नसल्याने तीन महिने धान्यही न मिळाल्याने तिच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्याने त्याची दखल घेत भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी शहापूरच्या तहसीलदार कार्यालयात तीन महिन्यांसाठी शिपाई पदावर तिची हंगामी नियुक्ती केली आहे. बुधवारी हाली हिला भिवंडीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात बोलावून नियुक्तीपत्र देऊन तिचा सन्मान केला.

पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून तिच्या शिधापत्रिकेची ऑनलाइन नोंदणी होत नाही, तोपर्यंत तिला ऑफलाइन धान्य देण्याचे आदेशही डॉ. नळदकर यांनी दिले आहेत. हाली हिने १२ वर्षांची असताना जंगलात लाकूड घेण्यासाठी गेली असता वाघाने केलेल्या हल्ल्यातून आपल्या बहिणीचे प्राण वाचविले होते. २०१२ मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते; परंतु त्यानंतर अशिक्षित असलेल्या हालीकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी सतत दुर्लक्ष केल्याने तिला आपल्या आयुष्यासाठी झगडावे लागले.

अंत्योदय शिधापत्रिका, घरकुल देण्यात आले तर उदरनिर्वाहासाठी आदिवासी प्रकल्पांतर्गत आश्रमशाळेत शिपाई पदावर हंगामी नेमणूक करून तिला मदत केली होती; परंतु लॉकडाऊनमध्ये आश्रमशाळा गेल्या एक वर्षापासून बंद असल्याने तेथील नोकरी तिने गमावली होती. त्यामुळे तिच्यावर पुन्हा एकदा दारिद्र्याचे जीवन जगण्याची वेळ आली होती. यावर उपाय म्हणून ही तीन महिन्यांची हंगामी नोकरी तिला उपविभागीय अधिकारी यांच्या प्रयत्नातून मिळाल्याने हाली हिने समाधान व्यक्त केले आहे.