शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

शाळा परिसरात गुटखा, तंबाखूची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 05:19 IST

‘कोप्टा’ कायद्यानुसार कारवाई : भिवंडीत सात लाखांचा गुटखा जप्त

ठाणे : राज्यात बंदी असतानाही शाळा, महाविद्यालयांच्या आवारात सर्रासपणे गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरू आहे. याविरोधात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने विशेष मोहीम राबवून सहा महिन्यांत ‘कोप्टा’अंतर्गत सुमारे ४५० जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील नौपाडा, ठाणे रेल्वेस्थानक परिसर, घोडबंदर रोड, वर्तकनगर या परिसरात शाळा आणि महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. याच परिसरातील पानाच्या ठेल्यांवर सिगारेट, तंबाखू आणि गुटखा यांची सर्रास विक्री होते. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी ठाणे आणि भिवंडीत ही विशेष मोहीम राबवली. यामध्ये विक्री करणाऱ्यांबरोबरच अमली पदार्थांचे सेवन करणाºयांवरही कारवाई करण्यात आली.महाराष्टÑ शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा गोदामांत बेकायदा साठा करून तो परिसरात विक्री करणाºया न्यू रॉयल सुपारी अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स आणि न्यू बॉम्बे सुपारी किराणा अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्स या भिवंडीतील दोन गोदामांवर खैरनार, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे, धर्मराज बांगर यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने १२ सप्टेंबर २०१८ रोजी कारवाई केली. या कारवाईत सात लाख ७० हजार ७१३ हजारांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त करून गोदामे सील केली.याच मोहिमेंतर्गत अमली पदार्थविरोधी पथकाने वागळे इस्टेट भागातून सहा किलोचा ९५ हजारांचा गांजा जप्त केला.पोलिसांकडून जनजागृतीतरुणांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस शाळा, महाविद्यालयांत जागृती करत आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे अधिकारी महाविद्यालयांमध्ये जाऊन समुपदेशन करत आहेत.

टॅग्स :thaneठाणे