शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातून मुंबईत गुटखा तस्करी करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 01:05 IST

ठाण्यातून मुंबईत गुटखा तस्करी करणाºया नसरे आलम रजी अहमद शेख (२३, रा. मीरा रोड, ठाणे) या टेम्पो चालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडे सात लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे साडे सात लाखांचा गुटखा जप्तआणखी दोघांचा शोध सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातून मुंबईत गुटखा तस्करी करणाºया नसरे आलम रजी अहमद शेख (२३, रा. मीरा रोड, ठाणे) या टेम्पो चालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून सुमारे साडे सात लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याच्या अन्य दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाण्यातील नितीन नाका ते तीन हात नाका बाजूकडे जाणाºया सेवा रस्त्याच्या मार्गाने एक टेम्पो गुटख्याची बेकायदेशीरपणे वाहतूक करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली घोडके यांच्या पथकाने नसरे याचा टेम्पो नितीन नाका ते तीन हात नाका मार्गावरील सेवा रस्त्यावर ४ जून रोजी दुपारी १२.५० वाजण्याच्या सुमारास पकडला. यातील मुख्य कथित आरोपी गुटख्याचा मालक आयुब (रा. जागेश्वरी) तसेच राजेश शेट्टी (रा. सायन, मुंबई) यांनी आपसात संगनमत करुन महाराष्टÑ शासनाने एक वर्षासाठी विक्री, वितरण आणि साठा करण्यासाठी प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची मुंबईत नेण्यासाठी वाहतूक केली जात होती. त्याच्याकडून सुमारे साडे सात लाखांचा गुटखा तसेच टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जमादार विजयकुमार गोºहे यांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील अन्य दोघांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक जे. पी. गावीत हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी