शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीच्या धाकानं १ कोटी ८६ लाखांचा ऐवज लंपास; परिसरात भीतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 22:59 IST

राहत्या घरात महिलेचे हातपाय बांधून बंदुकीच्या धाकानं चोरी

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांच्या टोळक्याने जगदीश बळीराम पाटील यांच्या घरात शिरून त्यांच्या कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून, घरातील आई व मुलाला दोरीने बांधून ठेवून 60 लाखांच्या रोख रकमेसह 1 कोटी 26 लाख 30 हजार रुपयांचे 421 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 1 कोटी 86 लाख 30 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दरोड्याचा गुन्हा दाखल होताच स्थानिक नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाला लागल्या आहेत.काल्हेर येथील गोदाम व्यावसायिक जगदीश बळीराम पाटील यांची ठाणे भिवंडी रस्त्यालगत बी.सी.अपार्टमेंट ही इमारत असून तिच्या पहिल्या मजल्यावर ते आपल्या पत्नी वंदना, मुलगा शुभम, मुलगी पल्लवी व वयोवृद्ध आई इंदिरा यांच्यासोबत राहत आहेत. जगदीश पाटील हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सहा वाजता घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे फक्त दरवाजा ओढला. त्यावेळी ते बाहेर पडताच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले चौघे लुटारू इमारतीच्या जिन्यावरून चढून त्यांनी घराचा दरवाजाचे आतील कुलूप उघडून लुटारु घरात शिरले. लुटारूंनी घरात प्रवेश करताच पत्नी वंदना व मुलगी पल्लवी झोपलेल्या खोलीत ते शिरले व दोघींना जगदीश पाटील यांना ठार मारू अशी धमकी देत पत्नी वंदनाचे हात दोरीने बांधून मुलीस कपाटाचे लॉकर उघडण्यास सांगून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम ताब्यात घेतले. त्यानंतर मुलगा शुभम झोपलेल्या खोलीत लुटारूंनी मोर्चा वळवला. त्यावेळी शुभम झोपेतून जागा होताच त्याचे सुद्धा हात दोरीने बांधून तेथील कपाटातील सर्व ऐवज काढून घेऊन अवघ्या 20 मिनिटातच घरातील 60 लाखांची रोकड व 1 कोटी 26 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 421 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आदी ऐवज घेऊन लुटारूंनी पोबारा केला आहे. घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व लुटून नेलेला मुद्देमाल पाहता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन श्वान पथक, ठसे तज्ञ आदींच्या पथकांना घटनास्थळी पाचारण केले. या प्रकरणी शुभम पाटील याने दाखल केलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघा लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली आठ तर गुन्हे शाखा भिवंडी, ठाणे, खंडणी विरोधी पथक अशी एकूण बारा पथके नेमण्यात आली असून काल्हेर परिसरातील सर्व सीसीटीव्हीचा तपास घेऊन आरोपींचा शोध सुरू केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.

टॅग्स :theftचोरी