Gudi Padwa 2018 : ढोलताशाने भरली तरूणाईत झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 03:30 AM2018-03-19T03:30:51+5:302018-03-19T03:30:51+5:30

ठाण्याच्या स्वागतयात्रेत हरियाली संस्थेतर्फेे बियाणे आणि रोप वाटप करण्यात आले.

Gudi Padwa 2018: Zodiac in the sunny day full of pompousness | Gudi Padwa 2018 : ढोलताशाने भरली तरूणाईत झिंग

Gudi Padwa 2018 : ढोलताशाने भरली तरूणाईत झिंग

googlenewsNext


ठाण्याच्या स्वागतयात्रेत हरियाली संस्थेतर्फेे बियाणे आणि रोप वाटप करण्यात आले. ठाणे जिल्हा न्यायालय वकील संघटनेच्या लेझीम पथकात ६३ वर्षाचे माजी न्यायमूर्ती डी. ए. जोशी सहभागी होऊन लेझीम सादरीकरण करीत होते. ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे, याची माहिती देणारा सीकेपी समाजाचा चित्ररथदेखील वैशिष्ट्यपूर्ण होता. यात त्यांनी ठाणेकरांना प्रतिकात्मक ४०० कचराकुंडीचे वाटप केले व कचरा नियोजनाची माहिती दिली. सरस्वती क्रीडा संकुलाच्यावतीने जिम्नॅस्टीकचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आधार संस्थेची विशेष मुले सहभागी झाली होती. पर्यावरण दक्षता मंडळाच्या चित्ररथाने प्लास्टिकचा वापर टाळा असे सांगत ‘घातक प्लास्टिकचा ध्यास, हरवेल पर्यावरणाचा श्वास’ हा संदेश दिला. बाळकुम पाडा नं. ३ येथील कोळी वेशभूषेत सहभागी झालेले मासेमारी दालदी मंडळदेखील आकर्षण ठरले. या मंडळाने आगरी कोळी संस्कृती दाखविली आणि कोळी गीतांवर नृत्यही सादर केले. एसटी लव्हर ग्रुपने शिवशाही एसटीचा प्रचार प्रसार या स्वागतयात्रेत केला. श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठानने इंधन, ऊर्जा आणि वीज बचतीचा संदेश दिला, तेली समाजाने भजन सादर केले. भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळाने विस्मृतीस गेलेले खेळ सादर केले. यात चमचा लिंबू, दोरी उड्या, कबड्डी, उभा खोखो, चमचा लिंबू यांसारख्या अनेक खेळांचे सादरीकरण केले. राम मारुती रोड येथे ढोलताशाचा गजर झाला आणि तरुणाईची पाऊले त्या दिशेने वळाली. वीर गर्जना ढोल ताशा पथकाचा ढोल ताशा निनादला आणि या वादनाने तरुणांची गर्दी खेचून घेतली. वादन संपेपर्यंत तरुणाईची खच्चून गर्दी झाली होती. कोणी शुटिंग करीत होते तर कोणी फोटो काढत होते. राम मारुती रोड आणि तलावपाळी येथे तरुणाईची सर्वाधिक गर्दी दिसून आली. झेंडा नृत्य, तलवार नृत्यदेखील स्वागतयात्रेत सादर झाले. गडकरी रंगायतन येथे पालखी आल्यावर राष्ट्रीय सेविका समितीच्या महिला पौराहित्य सुनंदा आपटे व त्यांचा संचने शिव महिम्न व शिवतांडव स्तोत्र पठण केले. दगडी शााळा- तीन पेट्रोल पंप- हरिनिवास- गोखले मार्ग, राम मारुती रोड- तलावपाळी- गडकरी रंगायतन या ठिकाणी स्वागतयात्रा समाप्त होऊन, पालखी मंदिरात विसर्र्जित झाली.

Web Title: Gudi Padwa 2018: Zodiac in the sunny day full of pompousness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.