शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पालकांचा आक्रमक पवित्रा : सेंट मेरी शाळेला ठोकले टाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 01:24 IST

फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त लादलेली पुस्तके मागे घेण्यासाठी पालक आणि पूर्वेतील सेंट मेरी शाळा व्यवस्थापनातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

कल्याण : फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त लादलेली पुस्तके मागे घेण्यासाठी पालक आणि पूर्वेतील सेंट मेरी शाळा व्यवस्थापनातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अभ्यासक्रमबाह्य पुस्तके घेतली नाहीत, म्हणून पाल्यांना मारहाण केल्याचा आरोप करत दोन शिक्षकांविरोधात दोन पालकांनी दिलेल्या तक्रारींवरून कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर, संतप्त पालकांनी बुधवारी सकाळी धाव घेऊ न शाळेला टाळे ठोकले. तसेच सुमारे अडीचशे पालकांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून मागण्या लेखी मान्य होईपर्यंत शाळेचे टाळे खोलू देणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला आहे.आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश गवई, नगरसेवक महेश गायकवाड, शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत गोटे, राजवंती मढवी आदी सहभागी झाले आहेत. कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरातील सेंट मेरी शाळेने यंदा केलेली फीवाढ व स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त लादलेली पुस्तके मागे घेण्याची पालकांची मागणी आहे. त्यासाठी निवेदने, आंदोलने, साखळी उपोषणासारखे मार्ग अवलंबूनही शाळा व्यवस्थापनाने आश्वासनांवर बोळवण केल्याचा पालकांचा आरोप आहे. दरम्यान, पालकांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने पालकांसह नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेविका राजवंती मढवी यांनी शाळेबाहेर साखळी उपोषण केले. तेव्हा महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शिक्षण विभागाने शासनाच्या नियमानुसार स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाचीच पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जावीत. इतर बोर्डांच्या अभ्यासक्रमाची सक्ती विद्यार्थ्यांवर नको, असे आदेश दिले होते. त्यानंतर, घेतलेली पुस्तके पालकांनी परत करण्याचा प्रयत्न केला असता शाळा व्यवस्थापन ती घेत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.दरम्यान, मंगळवारी रात्री आरती चव्हाण आणि वैष्णवी मिश्रा या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुस्तके घेतली नाही, म्हणून पाल्यांना मारहाण केल्याचा आरोप करत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून, श्वेता वाघ व आरती कदम या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर, ज्यांनी पुस्तके घेतली नाही, त्या विद्यार्थ्यांना शाळेत ओरडले जाते, मारले जाते, असा आरोप पालकांनी केला आहे.विद्यार्थ्यांना मारहाणीचा आरोप चुकीचा!शाळेचे संचालक भरत मालिक म्हणाले की, आम्ही सरकारच्या नियमाप्रमाणे फीवाढ केली आहे. ५० टक्के पालकांनी ती फी भरली आहे. काहींचा या फीला विरोध आहे. स्टेट बोर्डासोबत मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी इतर बोर्डांची पुस्तके घेण्यास सांगतो. ज्यांना ही पुस्तके हवीत, त्यांनी ती घ्यावी. कुणावरही सक्ती केलेली नाही.आम्ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती, तेव्हा त्यांनी यावर पालकांचे मत घ्यावे, असा सल्ला दिला आहे. हा पेटंट चार वर्षांपासून सुरू आहे. विद्यार्थ्यांना मारहाण केली, हा आरोप खोटा आहे. पोलिसांना आम्ही सीसीटीव्ही फु टेज तपासण्यास सांगितले. त्यात हा प्रकार कुठेही दिसला नाही. केवळ शाळेला बदनाम केले जात आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र