कुष्ठरोग रुग्णालयाच्या बांधकामास ‘जीएसटी’ बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:48 AM2017-11-06T03:48:42+5:302017-11-06T03:48:49+5:30

कुष्ठरुग्णांकरिता केडीएमसीकडून उभारण्यात येणा-या पहिल्यावहिल्या रुग्णालयाच्या कामाला वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) फटका बसला आहे.

GST hinders construction of leprosy hospital | कुष्ठरोग रुग्णालयाच्या बांधकामास ‘जीएसटी’ बाधा

कुष्ठरोग रुग्णालयाच्या बांधकामास ‘जीएसटी’ बाधा

Next

कल्याण : कुष्ठरुग्णांकरिता केडीएमसीकडून उभारण्यात येणा-या पहिल्यावहिल्या रुग्णालयाच्या कामाला वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) फटका बसला आहे. रुग्णालयाची निविदा मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने कुष्ठरुग्णांची परवड सुरु आहे.
जीएसटी लागू झाल्याने मंजूर झालेल्या निविदांच्या फायली आयुक्त पी. वेलरासू यांनी माघारी मागितल्या होत्या. यात रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाच्या फायलींचाही समावेश आहे. कुष्ठरुग्णांच्या हनुमाननगर वसाहतीमध्येच रुग्णालय प्रस्तावित आहे. त्यामुळे कुष्ठरु ग्णांना त्यांच्याच वसाहतीत उपचार घेणे शक्य होणार आहे. केडीएमसी प्रशासनाने रु ग्णालय उभारण्यासाठी ६० लाख रु पयांच्या निधीची
तरतूद अंदाजपत्रकात केली
आहे.
प्रस्तावित रुग्णालय ठाणे जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्रातील कुष्ठरुग्णांकरिता पहिले शासकीय रु ग्णालय ठरणार आहे. जागा आणि निधी उपलब्ध झाल्यामुळे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असताना, तसेच निविदा प्रक्रिया पार पडली असताना जुलै महिन्यात जीएसटी लागू झाला.
परिणामी, रुग्णालयाच्या उभारणीत व्यत्यय आला. हनुमाननगर कुष्ठरोग वसाहतीत ११० कुष्ठरुग्ण राहतात. या रु ग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने त्यांच्या जखमा चिघळतात. तसेच रुग्णांची संख्याही वाढण्याची भीती आहे.
राज्यात सध्या २२ हजार कुष्ठरु ग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ख्रिश्चन मिशनरींची आसनगाव, वर्सोवा, वडाळा, मिरज येथे रु ग्णालये असली, तरी एकही शासकीय रु ग्णालय नाही.
यासंदर्भात महापालिकेचे विशेष प्रकल्प विभागाचे कनिष्ठ अभियंता शैलेश मळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: GST hinders construction of leprosy hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी