शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर बद्दलच्या तक्रारींचे दर गुरुवारी केले जाणार निवारण

By धीरज परब | Updated: July 9, 2024 18:15 IST

आयुक्तांनी सुरु केला तक्रार निवारण 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर मधील नागरिकांच्या मालमत्ता कर बाबत असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दर गुरुवारी तक्रार निवारण सप्ताहाची सुरवात केली आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत  ३ लाख १५ हजार निवासी तर ५५ हजार वाणिज्य वापराच्या अश्या एकूण ३ लाख ७५ हजार मालमत्ता आहेत. मालमत्ता कर आकारणी पासून क्षेत्रफळात बदल , आकारणी दर वा शुल्क बदल , मालमत्ता हस्तांतरण , नाव वा पत्यात दुरुस्ती,  मालमत्ता नसताना कर आकारणी सुरूच ठेवणे आदी विविध कामासाठी नागरिकांना पालिकेच्या खेपा माराव्या लागतात . लहान सहान कामांसाठी सुद्धा अनेकदा नागरिकांची अर्थपूर्ण अडवणूक केली जाते . 

ह्या बाबतच्या तक्रारी आयुक्त काटकर यांच्या कानावर आल्या होत्या .महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांच्या मालमत्ता कर विषयक दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवा, पारदर्शक, गतिमान व विहित काळ मर्यादित देण्यासाठी तक्रार सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला . 

८ जुलै रोजी आयुक्तांच्य्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांच्या उपस्थितीत मालमत्ता कर विभागामार्फत तक्रार सप्ताह आयोजन करणे कामी आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस सहाय्यक आयुक्त मालमत्ता कर विभाग चंद्रकांत बोरसे, सिस्टीम मॅनेजर राज घरत व सर्व कर निरीक्षक उपस्थित होते. 

अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दर गुरुवारी शासकीय सुटटीचे दिवस वगळून दुपारी ३ ते ५ या वेळेत  महानगरपालिका मुख्य कार्यालय, दुसरा मजला, स्थायी समिती सभागृह  येथे मालमत्ता कर तक्रार सप्ताहाचे  आयोजन केले जाणार आहे .  या तक्रार सप्ताहात मालमत्ता कर आकारणी, नावात व पत्त्यात दुरुस्ती, कर विभागणी, देयकात दुरुस्ती व मालमत्ता कराच्या सबंधित इतर तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. 

सदर मालमत्ता तक्रार सप्ताहात नोंदवही तयार करून आलेल्या तक्रारींचे आठ दिवसात निराकरण करून दर गुरूवारच्या बैठकीत केलेल्या कार्यवाहीची माहिती आयुक्त यांना देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्ता कर बाबत तक्रारी असल्यास नियोजित केलेल्या तक्रार सप्ताहासाठी महापालिका मुख्य कार्यालयात दर गुरुवारी दुपारी ३  ते ५ वाजेपर्यंत अर्ज व कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन  आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांनी  सर्व मालमत्ता धारकांना केले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक