शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त, रुग्ण नसणाऱ्या गावांत हिरवा झेंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 00:50 IST

Coronavirus Thane News : ज्या ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद नसणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात हिरवा झेंडा लावण्यात येत आहे. याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. 

ठाणे  - ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात येत आहे. ठाणे जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, त्या क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करणे आदींसह ज्या ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद नसणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात हिरवा झेंडा लावण्यात येत आहे. याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील ३७६ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला. त्या वेळी जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांमध्ये सुरुवातीच्या काळात दररोज कमी रुग्ण आढळून येत होते. कालांतराने या भागात दिवसाला शंभरहून अधिक रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. यामुळे या भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार २७०, तर मृतांची संख्या ५६५ वर पोहोचली आहे. त्यामुळे रुग्णांची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून सर्वेक्षण करण्यावर भर देत आहे. तसेच कोरोना प्रतिबंधित करण्याविषयी जनजागृती करणे, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना क्वारंटाइन सेंटर, फिव्हर क्लिनिक, अँटिजन टेस्टिंग साइट या ठिकाणी सेवा देण्यासाठी प्रवृत्त करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले आहे.आता ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायतीच्या क्षेत्रात तसेच गावात हिरवा झेंडा लावण्याची नवी युक्ती लढवली. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४३० ग्रामपंचायतींपैकी ३७६ ग्रामपंचायतींमध्ये २८ दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नसल्याने त्या गावांमध्ये कोरोनामुक्तीचा झेंडा रोवला आहे. त्यात मुरबाड तालुक्यातील सर्वाधिक १२३ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. ग्रामीण भागात जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कोरोना आजाराचे गांभीर्य, त्यांचे परिणाम याबाबत जनजागृतीचा फायदा झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस