शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियामुळे आजीबाई स्वगृही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 02:22 IST

मायलेकांची घडली भेट; ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

ठाणे : मध्य प्रदेशमधून हरवलेल्या ६५ वर्षीय सुमित्रा देवांगन या तब्बल सहा महिन्यांनी स्वगृही परतल्या आहेत. यात सोशल मीडियाची महत्त्वाची भूमिका ठरली आहे. चिडचिड, कधीकधी असंबद्ध बोलणे, परिपूर्ण माहिती न देणे अशा सगळ्या अडचणींतून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्यांची माहिती कशीबशी गोळा केली आणि त्यातून मायलेकांची भेट घडून आली.सुमित्रा देवांगन यांचे हाड मोडल्याने १७ एप्रिल २०१९ रोजी तुळिंज पोलिसांनी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांची बेवारस म्हणून नोंद केली होती. दरम्यान, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील डॉक्टरांनी उपचार सुरू केले. त्यातून त्यांचा चिडचिडा स्वभाव, कधीकधी वेगळेच बोलणे, परिपूर्ण माहिती न देणे असे प्रकार सुरू असताना रुग्णालय प्रशासनाने त्यांच्यावर योग्य उपचार तर केलेच, त्याचबरोबर रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक श्रीरंग सिद यांनी त्यांना बोलतेही केले. त्यावेळी त्यांनी चापा, जांजगीर, जिल्हा बिलासपूर अशी मोडकीतोडकी माहिती दिली. ती माहिती तुळिंज पोलिसांना दिल्यावर त्यांनी बिलासपूर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर बिलासपूर पोलिसांनी महिलेच्या देवांगन आडनावावरून ती माहिती तेथील देवांगन समाजाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकली. त्यानुसार, आजीबाई अनुपपूर येथील असल्याचे समोर आले. त्यानंतर, त्यांचा मुलगा श्यामलाल आणि नातेवाइकांनी बुधवारी ठाणे गाठून त्यांना स्वगृही नेले. दरम्यान, ती सहा महिन्यांपूर्वी हरवल्याची तक्रार अनुपपूर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहे. सुमित्रा यांना मानसिक विकार असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया