शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

सरकारचा फक्त हिंदूधर्माला राजाश्रय

By admin | Updated: October 30, 2016 20:58 IST

या देशात बौद्ध धम्माला सरकारकडून राजाश्रय मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र भारतात बौद्ध धम्माची पिछेहाट झाली आहे. या देशातील सरकार हिंदू धर्माच्या महाकुंभ मेळाव्यावर कोटय़ावधी रुपये खर्च करते.

ऑनलाइन लोकमत

कल्याण, दि. 30-  :  बुद्धांची जन्मभूमी भारत आहे. या देशात बौद्ध धम्माला सरकारकडून राजाश्रय मिळत नाही. त्यामुळे स्वतंत्र भारतात बौद्ध धम्माची पिछेहाट झाली आहे. या देशातील सरकार हिंदू धर्माच्या महाकुंभ मेळाव्यावर कोटय़ावधी रुपये खर्च करते. या देशात फक्त हिंदू धर्माला राजाश्रय मिळतो. हा देश जर धर्म निरपेक्ष आहे असे राजकर्ते आणि सरकार सांगते तर त्यांनी त्यांची धर्म निरपेक्षता सिद्ध करावी. अन्य धर्माच्या परिषदांसह मेळाव्यांना कुंभ मेळाव्याप्रमाणो निधी द्यावा अशी मागणी ऑल इंडिया भिक्कू महासंघाच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष भदंत बोधीपालो महाथेरो यांनी केली आहे. दोन दिवसी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन कल्याणच्या वालधूनी अशोकनगरातील बुद्धभूमी फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. आज यापरिषदेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी भदंत बोधीपालो महाथेरो यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी उपरोक्त मुद्दा उपस्थित केला.त्यांनी सांगितले की, भारतात स्वातंत्र्यानंतर बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला नाही. बुद्धाचा विचार हा समतावादी आहे. इतर धर्माचा विचार हा दैववाद, विषमतावाद आणि आत्मवादाला प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे देशाची एकात्मकता दुभंगली आहे. बुद्धाचा विचार उदारमताने स्विकारला पाहिजे. तर देश विषमतावादातून बाहेर येऊ शकतो. बुद्धाची जन्मभूमी भारतआहे. त्याच देशाचे सरकार बौद्ध धर्माच्या पाठीशी नाही. इतर देशात बौद्ध धर्मिय बहुल आहेत. ते देश जपान, चीन, थायलंड या देशाचे सरकार बौद्धांच्या धम्म मेळाव्यास व त्यादेशातील इतर धर्मियांच्या धार्मिक कामास समान निधीचे वाटप करतात. त्यांच्याकडून कोणताही दुजाभाव केला जात नाही. दुदैवाने आपल्या देशात केवळ हिंदूच्या कुंभमेळाव्यास सरकारकडून निधी दिला जातो. सगळ्य़ा धर्माचा विचार होणो आवश्यक आहे. बुद्ध काळात बहुजनांची बोलीभाषा ही पालीभाषा होती. पाली भाषेत बौद्ध साहित्य होते. त्यानंतर जी काही सांस्कृतिक अतिक्रमणो झाले. त्या आक्रमणात बौद्ध धर्माची पिढेहाट झाली. त्यामुळे बहुजनांची पालीभाषा ही मागे पडली. तिची ज्या त्या काळच्या राज्यकत्र्यानी संस्कृत भाषेला दिली. त्यामुळे संस्कृत भाषा ही देवभाषा गणली गेली. बुद्धांची जन्मभूमी असलेल्या भारतात नालंदा व तक्षशीला ही दोन जागतिक दर्जाची विद्यापीठेहोती. पुन्हा पालीभाषेला महत्व प्राप्त करुन देण्यासाठी केंद्र सरकारने देशात पालीभाषा विद्यापीठ सुरु करावे अशी मागणी भिक्कू महासंघाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे भदंत बोधीपालो महाथेरो यांनी केली आहे. धम्म प्रचार व प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय धम्म परिषदेस जमान, कोरिया, चीन, थायलंड, मलेशिया, भूतान, नेपाळ, श्रीलंका, आदी देशातून भिक्क उपस्थित झाले आहेत. बुद्धभूमी फाऊंडेशन व राष्ट्रनिर्माते बाबासाहेब आंबडेकर विचार महोत्सव समिती मुंबईच्या वतीने ही परिषद आयोजित केली गेली आहे. या परिषदेत 100 पेक्षा जास्त देश विदेशातील भिक्कू सहभागी झाले आहेत. परिषदेच्या आयोजनासाठी भदंत गौतमरत्न थेरो व हर्षदीप कांबळे यांनी पुढाकार घेतला आहे. 50 हजार पेक्षा जास्तबौद्ध समाजबांधव या परिषदेला हजेरी लावणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या ग्रंथांचे प्रदर्शन या ठिकाणी भरविण्यात आले आहे. धम्म विषयक पुस्तके, मासिके, सिडी, ङोंडे, ध्वज आदीचे स्टॉल्स उभारण्यात आले आहे. भव्य एलएडी स्क्रीन लावण्यात आली आहे. स्टेजवर पॅगोडा टाईप निळ्य़ा छत्र्यांनी सजावट करण्यात आली आहे.