शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

गुडविन फसवणूक प्रकरण: अकराकरण बंधूंची केरळमध्ये ५० कोटींची मालमत्ता

By जितेंद्र कालेकर | Updated: December 16, 2019 00:15 IST

गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण यांच्या सुमारे ५० कोटींच्या २१ मालमत्ता केरळसह इतर ठिकाणी आढळल्या आहेत. त्यातील बहुतांश मालमत्ता जप्त केल्या असून वर्षभरात या मालमत्तांच्या लिलावातून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे न्यायालयाच्या मार्फतीने परत करता येऊ शकतील, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देदोन मर्सिडीजसह १० वाहने, मॉल, बंगल्यांसह ९० एकरची जमीनदिड कोटींची रोकड असलेली बँक खाती गोठवली

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ भागांतील सुमारे १२०० गुंतवणूकदारांची २५ कोटींची फसवणूक करणा-या ‘गुडविन ज्वेलर्स’च्या सुनीलकुमार आणि सुधीरकुमार अकराकरण या दोन्ही बंधूंची केरळसह इतर ठिकाणी सुमारे ५० कोटींच्या २१ मालमत्ता आढळल्या आहेत. त्यातील बहुतांश मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून वर्षभरात या मालमत्तांच्या लिलावातून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करता येऊ शकतील, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने ‘लोकमत’ला दिली.ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस उपायुक्त संजय जाधव आणि सहायक आयुक्त सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत होती. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव, नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, शंकर चिंदरकर आणि वनीता पाटील आदींचा समावेश होता. महाराष्टÑात शेकडो लोकांच्या फसवणुकीनंतर अकराकरण बंधूंनी केरळातील त्रिशूर जिल्ह्यात जमीन आणि स्थावर मालमत्ताखरेदीमध्ये मोठी गुंतवणूक केली. केरळमध्येच त्यांची एक तीन मजली इमारत आहे. याशिवाय, आलिशान मॉल, सुमारे ९० एकर जमीन, बंगले, रिसॉर्ट अशा एकापेक्षा एक ४० ते ५० कोटींच्या २१ मालमत्ता आढळल्या आहेत. यातील अनेक मालमत्तांची त्यांच्याच नातेवाइकांच्या मदतीने खातरजमा केल्यानंतर त्या सीलबंद केल्या आहेत. दोन महागड्या मर्सिडीज मोटारकारसह फॉर्च्युनर, इनोव्हा अशा दीड ते दोन कोटींच्या १० मोटार कारचाही त्यामध्ये समावेश आहे. बँकेतही सुमारे दीड कोटींची रक्कम आढळली असून ती खातीही गोठविण्यात आली आहेत. ठाण्यातील नौपाडा, डोंबिवलीतील मानपाडा आणि अंबरनाथमधील शिवाजीनगर या तीन पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत ११५४ गुंतवणूकदारांची त्यांनी २५ कोटींची फसवणूक केल्याचे आढळले आहे. मात्र, राज्यातील पालघर, नवी मुंबई, पुण्यातील पिंपरी-चिंचवड आणि ठाणे ग्रामीण अशा विविध ठिकाणीही या ज्वेलर्सने तीन ते चार हजार गुंतवणूकदारांची ९० कोटींपेक्षा अधिक फसवणूक केल्याचे आढळले आहे. सुरुवातीला ठाणे पोलिसांना त्यांची २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. परंतु, त्यांच्या मालमत्तांची तसेच यातील आणखी फरारी आरोपींची माहिती मिळविण्यासाठी अकराकरण बंधूंच्या पोलीस कोठडीमध्ये आणखी वाढ करण्यासाठी ठाणे न्यायालयाकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून मागणी केली जाणार आहे. ती मिळाल्यानंतर इतरही जिल्ह्यातील पोलीस त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी