शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रामध्ये उत्तम पाऊस; पाणी साठ्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 19:06 IST

गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी कमी झाल्याचे  समोर आले आहे.

ठाणे - चार दिवसांपासून संतत धार पडणाऱ्या पावसाची आजही जिल्ह्यातील सातही तालुक्यात रिपरिप सुरुच आहे.पण यंदा गेल्या काही दिवसांपासून धरणांमध्ये मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळे पाणी कपातीची चिंता आता काही अंशी कमी झाल्याचे  समोर आले आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण, आंध्रा, मोडक सागर १०० टक्के भरले होते, तर भातसा, तानसा आणि मध्यवैतरणा भरण्याच्या उंबरठ्यावर होते.गेल्या वर्षी धरणातील पाणी साठा झपाट्याने वाढल्यामुळे सर्व धरणे आँगस्ट संपण्या आधी भरले होते. मात्र यंदा पाऊस लांबणीवर पडल्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणी साठ्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र त्या दिवसापासून पाऊस लागून असल्यामुळे धरणांच्या पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. यामुळे पाणी समस्येची चिंता आता काही अंशी कमी झाली आहे. निवासी भागात पडणार्‍या पावसाच्या तुलनेत आज धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर दिसून येत आहे.बारवी धरणासह भातसा, आंध्रा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा धरणांच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीच्या बारवी धरणात २४ तासात आज सरासरी ७१.५० मिमी पाऊस पडला आहे. यापैकी बारवी धरणात ३२ मिमी., खानिवरे ११६, कान्होळ ३७, पाटगांव ८३ आणि ठाकूरवाडी ५० मिमी. सर्व साधारण पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. आता या धरणाची पाणी पातळी ६८.९६ मीटर झाली आहे. या धरणात अजून ३.६४ मीटर पाणी साठा होणे अपेक्षित आहे. तत्पूर्वी या धरणात आज ७१.२२ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी तो १००.११ टक्के होताबारवी धरणात ७२.६० मीटर म्हणजे ३४०.४८ दशलक्ष घनमीटर पाणी धरणात साठा यंदा करण्यात येणार आहे. त्यासाठी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून साडे तीन मीटर पाणी पाणी होणे आवश्यक आहे. त्यानंतर या पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. बारवी प्रमाणेच भातसा धरणात ८०.८९ टक्के पाणी साठा झाला आहे. आज धरणात ३८ मिमी पाऊस पडला आहे. तर आंध्र धरणात यंदा प्रथमच आज ८१ मिमी पाऊस पडला. आता या धरणात ५२.५७ टक्के पाणी साठा झाला आहे. मोडक सागरमध्ये ५१ मिमी पाऊस पडला आता या धरणात ९०.६३ टक्के साठा आहे. तानसात 21 मिमी पाऊस पडला असून आता धरणात ७९ टक्के पाणी साठा तयार झाला. तर मध्ये वैतरण आज ५० मिमी पाऊस पडला असता धरणात आता ८२ टक्के पाणी साठा संकलीत झाला आहे.जिल्ह्यात या पावसाच्या रिपरिप मुळे आज सरासरी २३ मिमी पाऊस पडल्याची नोंद घेतली आहे. यापैकी १७ मिमी., कल्याणला ३१, मुरबाडला २०, भिवंडीला १३, शहापूरला ४६, उल्हासनगरला २९ आणि अंबरनाथला १२मिमी पाऊस आज पडला आहे .

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणे