शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सोने खरेदीत यावर्षी २५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:56 IST

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या सोने खरेदीत यंदा २५ टक्के वाढ झाल्याने सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण होते. लग्नसराई, साखरपुडा, मुंजीचे मुहूर्त असल्याने ग्राहकांनी ज्वेलर्सकडे गर्दी केली होती.

डोंबिवली : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होणाऱ्या सोने खरेदीत यंदा २५ टक्के वाढ झाल्याने सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण होते. लग्नसराई, साखरपुडा, मुंजीचे मुहूर्त असल्याने ग्राहकांनी ज्वेलर्सकडे गर्दी केली होती. सोन्याच्या नाण्यांना सर्वाधिक मागणी होती. अनेक महिन्यांनी दुकानांमध्ये गर्दी झाल्याने सराफा व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले.आॅल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे संस्थापकीय संचालक नितीन कदम यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळपासून ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह होता. त्यामुळे सायंकाळपर्यंत चांगला व्यवसाय झाला. अक्षयतृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेकांनी या परंपरेनुसार खरेदी केली. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने हा मुहूर्त चांगला ठरल्याचे त्यांनी सांगितले.साडेतीन मुहूर्तावर दागिने घेण्यासाठी ग्राहकांची दिवसभर लगबग होती. त्यामुळे वळ, नाणी, अंगठी, चैन, छोटेखानी मंगळसूत्र आदींना मागणी होती. खरेदी होवो न् होवो, मात्र अनेक महिन्यांनी ग्राहक पेढीवर आल्याने आनंद झाल्याचे सराफ व्यावसायिक वाघाडकर ज्वेलर्सचे संचालक प्रफुल वाघाडकर यांनी सांगितले.ठाणे, डोंबिवलीमध्ये सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ३१०० ते ३४०० रूपये होता. त्यानुसार नाणी, वळ उपलब्ध होती. ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी आधीच बुकिंग करण्यात आले होते. मंगळवारी ग्राहक औपचारिकता म्हणून त्यांच्या वेळेनुसार सोने घेऊन गेल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय तृतीयाthaneठाणेGoldसोनं