शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

सोने खरेदीचा पाडव्याचा मुहूर्त काेराेनामुळे वाया, ज्वेलर्स दुकाने बंद, सराफांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 11:58 PM

Gold : गुढीपाडव्यावर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षभरात सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी सराफ बाजाराला साधता आली नाही.

नालासोपारा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर आवर्जून सोने खरेदी केली जाते, परंतु कोरोना निर्बंधांमुळे ज्वेलर्स दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. काही सोने व्यापाऱ्यांनी ऑनलाइन खरेदी, दूरचित्र संवाद माध्यमातून विक्रीचे पर्याय अंमलात आणले होते, परंतु सोने ऑनलाइन खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. गुढीपाडव्यावर गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनाचे सावट आहे. गेल्या वर्षभरात सण, सोने खरेदीचे मुहूर्त, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी सराफ बाजाराला साधता आली नाही. सोन्याचे दर काही दिवसांपासून कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची व्यापाऱ्यांना आशा होती, मात्र बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अनेक व्यापारी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरचित्र संवाद माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत  आहेत. सोन्यासह अन्य मौल्यवान धातूंचे दागिने व वस्तू विक्रीतील काही मोठ्या ब्रँडने ऑनलाइन खरेदीचा पर्याय ग्राहकांना दिला आहे. दरम्यान, किमान पाडव्याला तरी सोने-चांदीची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी छोट्या ज्वेलर्स मालकांनी तुळींज पोलिसांना सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात येऊन केली.

गेल्या वर्षीही पाडव्याला ज्वेलर्स दुकाने बंद होती. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोने विक्री व्यवसायाची अवस्था बिकट झाली असून बाजारात पैसे अडकले आहेत. लोकांचे दागिने बनवून तयार आहेत, पण सगळे व्यवहार ठप्प आहेत. – गौरव बडोला, ज्वेलर्स व्यावसायिक, नालासोपारा

टॅग्स :Goldसोनं