शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

गोलभणला दीड महिन्यापासून सुरू आहे टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:20 IST

दोन कोटींची प्रस्तावित पाणीयोजना; पाण्याचा सोर्सच नसल्याने टंचाई

- जनार्दन भेरे भातसानगर : शहापूर तालुक्यातील अनेक गावांना या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके बसत आहेत. त्यापैकीच एक गाव म्हणजे गोलभण.गोलभणची लोकसंख्या सहाशेपेक्षा अधिक असून मुंबई-नाशिक महामार्गाला लागून हे गाव आहे. या गावात पाण्यासाठी चारपाच विहिरी आहेत. मात्र, परिसरात या गावाला पाण्याचे काही स्रोतच नसल्याने साधारणपणे मार्च महिन्यात या गावाला टंचाईचा सामना करावा लागतो. यंदा मात्र पाऊस लवकर गेल्याने टंचाई निर्माण झाली. ग्रामपंचायत पातळीवर या गावाला पाणी पुरवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आले. मात्र, अद्याप प्रशासनाची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे, तब्बल दीड महिना या गावाला दररोज टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.दरवर्षी या गावाला टंचाई निर्माण होते. मात्र, आजपर्यंत या गावाला ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या गावात शासनाने तसेच गावकऱ्यांनी अनेक ठिकाणी बोअरवेल लावूनही ९५ टक्के बोअरवेलला पाणीच न लागल्याने त्यांचा खर्चही फुकट गेला आहे.या गावाच्या पाणीटंचाईची समस्या कायमची सुटावी, यासाठी ग्रामपंचायतीने गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या भातसा बॅक वॉटरमधून तब्बल दोन कोटींची योजना प्रस्तावित केली आहे. गोलभण, जरंडी, धामणी, तलेखाण या गावांना योजनेचा फायदा होणार आहे. प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.गोलभण गावाला दीड महिन्यापासून पाणीपुरवठा सुरू असून या चार गावांचा पाण्याचा प्रश्न कायम सुटावा, यासाठी साधारणपणे दोन कोटींची योजना जिल्ह्याला प्रस्तावित करण्यात आली आहे.- जी. मडके, ग्रामसेवक, गोलभणज्या ग्रामपंचायतीचे प्रस्ताव आहेत, ते मंजुरीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत. त्यांना मंजुरी मिळाल्यानंतरची प्रक्रि या सुरू होईल.- एम.जी. आव्हाड, उपकार्यकारी अभियंता, शहापूर

टॅग्स :droughtदुष्काळ