शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

 तसा संकल्प करून देव यश देत नाही - नीलम गोऱ्हे

By अजित मांडके | Updated: October 21, 2023 18:55 IST

विजयादशमीच्या आझाद मैदानावरील सभेसाठी आमचे सगळे तयारी करत आहेत.

ठाणे: विजयादशमीच्या आझाद मैदानावरील सभेसाठी आमचे सगळे तयारी करत आहेत. एका बाजूला सातत्याने द्वेषाचे राजकारण होत आहे. कोणाला तरी विरोध करायचा समोरच्या माणसाला आयुष्यातून उठवायचे असा संकल्प केला जातो. पण असा संकल्प करून देव यश देत नसतो. असा टोला ही निलम गोऱ्हे यांनी लगावला. तर आझाद मैदाना वरील मेळावा हा  लोकांना विकास होण्याच्या दुष्टीने स्फूर्ती देणारा कार्यक्रम असेल. असे मत विधान परिषदेच्या उपसभापती यांनी व्यक्त केले.

टेंभी नाका येथील देवीचे गोऱ्हे यांनी शनिवारी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेता मीना कांबळी, आमदार मनीषा कायंदे माजी नगरसेविका तृष्णा विश्वासराव आदी उपस्थितीत होत्या.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी २२ विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजना नुसत्या जाहीरच नाही केल्या तर शिवदुतांच्या मार्फत त्याची अंमलाबजावणी करण्यासाठी सयंयोजन सुरु केले आहे. केवळ संकल्प करून न थांबता त्याची अंमलबजवानी करणारी यंत्रणा सरकारच्या बरोबरीने उभी करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्धार आहे. माझ्या मते जिथे महिलांना धोका वाटतो तिथे वेळ पडल्यास महिलांना शस्त्राचे परवाने दया अशी भूमिका मी विधीमंडळात मांडली असल्याच्या त्या म्हणाल्या. 

संजय राऊत आरोप करतात की आमचा पक्ष  ड्रग्जच्या बाजूने आहे का?. पण माझा त्यांना सवाल आहे की तुमच्याच पक्षातील तो ललित पाटील उबाठा तुन कधी बाहेर पडला. त्याच्यावर कधी कारवाई केली. तो तुमच्याच पक्षात आहे. त्याने कधी राजीनामा दिला तो अटकेत आहे. पण तुम्ही आम्हालाच उलटे प्रश्न करतात. असे खडे बोल त्यांनी सुनावले. नाना पटोले यांच्या बाबत त्यांना छेडले असता पटोले यांनी आधी हे स्पष्ट करावे की त्यांनी कोणाला ही विश्वासात न घेता विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा का दिला? त्याचा पुढील राजकारणावर काय परिणाम झाला हे सर्वानी पहिले आहे. तर महिला धोरणाबाबत एक महिन्यापूर्वी कॅबिनेटमध्ये चर्चा होण्याबाबतची पूर्व तयारीची बैठक झाली होती. आता पुढच्या दोन महिण्यात धोरण मंजूर होईल अशी अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.  

टॅग्स :thaneठाणेNeelam gorheनीलम गो-हेSanjay Rautसंजय राऊत