`वैद्यकीय पदांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या`

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST2021-09-18T04:43:45+5:302021-09-18T04:43:45+5:30

भिवंडी : भिवंडी निजामपूर महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता विविध वैद्यकीय पदांची ...

`Give preference to locals in recruitment of medical posts` | `वैद्यकीय पदांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या`

`वैद्यकीय पदांच्या भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या`

भिवंडी : भिवंडी निजामपूर महापालिका कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरिता विविध वैद्यकीय पदांची तात्पुरत्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील जाहिराती मनपा प्रशासनाने प्रसिद्ध केली. या भरती प्रक्रियेत शासन नियमानुसार स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, अन्यथा भरती होऊ देणार नाही, असा इशारा स्थायी समिती सदस्य अरुण राऊत यांनी प्रशासनाला दिला.

महापालिकेत होणाऱ्या वैद्यकीय पदांच्या भरतीमध्ये भिवंडी शहर व भिवंडी तालुक्यामधील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळते की नाही हे पाहण्याकरिता भरती करण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी स्थायी समितीला द्यावी, अशी मागणी राऊत यांनी केली.

............

वाचली

Web Title: `Give preference to locals in recruitment of medical posts`