शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नाराजांना तहहयात पदे द्या; अंतर्गत कलह पोचला शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 02:53 IST

चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी स्थायी समितीचा राजीनामा दिला आणि पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा समोर आला.

ठाणे  - चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी स्थायी समितीचा राजीनामा दिला आणि पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा समोर आला. मुल्ला यांच्यासह नाराज १० ते १२ नगरसेवक पुढील आठवड्यात पक्षप्रमुख शरद पवार यांची पुन्हा भेट घेऊन, या मुद्यावर गुणात्मक चर्चा करण्याची मागणी करणार आहेत. परंतु, त्याआधीच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पवार यांना पत्र पाठवून षटकार मारला आहे. प्रदेशस्तरावरील पदे आम्हाला नकोत. शहराध्यक्षपद तसेच विरोधी पक्षनेतेपदही मुल्ला आणि जगदाळे यांना तहहयात देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे राष्टÑवादीतील अंतर्गत कलह आता टोकाला पोहोचला आहे.राष्टÑवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी स्थायी समितीचा राजीनामा दिला. अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर झाला नसला तरी, त्यांच्या समर्थनार्थ राष्टÑवादीतील काही नगरसेवक पुढे आले आहेत. यामध्ये लोकशाही आघाडीचे गटनेते हणमंत जगदाळे यांचाही समावेश आहे. तीन महिन्यांपूर्वी या नाराज मंडळींनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गाºहाणे मांडले होते. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. आता नव्याने सुरू झालेले राजीनामानाट्य पालिका वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या नाराजांनी ठाण्याची राष्टÑवादी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असल्याचा आरोप केला आहे. पुढील आठवड्यात शरद पवार यांची पुन्हा भेट घेण्याची तयारीही त्यांनी चालवली आहे. या भेटीतून त्यांच्या हाती काही लागण्याची शक्यता कमी असल्याने, पक्षातून आम्हाला काहीच मिळणार नसेल तर राहायचे कशाला, असा सूर या मंडळीने आळवला आहे. त्यामुळे येत्या काळात ठाणे शहर राष्टÑवादीमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. पवार यांच्या बैठकीमध्ये गुणात्मक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा नाराज गटाने व्यक्त केली आहे. तशी चर्चा झाली नाही, तर मात्र वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीतसुद्धा ही मंडळी असल्याची माहिती राष्टÑवादीच्या सूत्रांनी दिली.दरम्यान, पुढील आठवड्यात १० ते १२ नाराज नगरसेवक पवार यांची भेट घेणार असले, तरी त्याआधीच विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी पवार यांना पत्र पाठवून खळबळ उडवून दिली आहे.मला आणि परांजपे यांना प्रदेशच्या कमिटीवर जी पदे देण्यात आली आहेत, त्यातून मुक्त करावे. आम्ही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून निष्ठेने काम करू, असे पाटील यांनी या पत्रात नमूद केले आहे. एकूणच राष्टÑवादीमधील हा वाद आता आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत असून येत्या काळात या पक्षात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत यातून मिळत आहेत.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस